Ajit Pawar : 'तो' प्रश्न विचारताच अजित पवारांचा पारा चढला; म्हणाले...

Ajit Pawar News : 'मला काय दुधखुळा समजला काय...?'
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar News : राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर अधिवेशन काळासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर निलंबनावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली नाही तर मवाळ भूमिका घेतली अशी चर्चा होती.

याच पार्श्वभूमीवर अजित पवारांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र प्रश्न विचारताच पवारांचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळालं. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, ''शरद पवार नाराज आहेत हे धांदात खोटं आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलं. शरद पवारांनी (Sharad Pawar) तुम्हाला फोन करून सांगितलं का?, तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. पण आपल्या ज्ञानामध्ये अशी भर कोणी घातली?'' असा सवाल करत ''मी तर साहेबांच्या रोज संपर्कात असतो'', असं ते म्हणाले.

Ajit Pawar
Pratap Darade : सातपुतेंची मागणी देसाईंची घोषणा अन् पीआयच्या बदलीविरोधात लोकं रस्त्यावर

''तुम्हाला ब्रेकींग बातम्या मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या पसरवता. पण यामुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. मी विरोधी पक्षनेता आहे, मला माझं काम कळतं. मी काय दूधखुळा नाहीये. मी गेल्या ३२ वर्षांपासून समाजकारण, राजकारण आणि प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका'' असं म्हणत त्यांनी पत्रकाराला खोचक टोला लगावला.

Ajit Pawar
‘अजितदादा, तुमची वेळ चुकली...तो शपथविधी दुपारी झाला असता तर तुम्ही आज मुख्यमंत्री असता’ : भाजप आमदाराने फोडले गुपीत

''मला ज्या आमदारांनी विरोधी पक्षनेते पद दिलं त्यांना याबद्दल काय वाटतं ते आम्ही बघू. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसवणाऱ्या आमदारांना माझं काम माहिती आहे'', अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला खडसावलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com