Ajit Pawar : जयंत पाटलांसाठी अजितदादांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती; फडणवीस म्हणाले...

Ajit Pawar News : अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याबाबत...
Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar and Devendra FadnavisSarkarnama

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून असंसदीय शब्द वापरल्याने त्यांच्यावर गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याबाबत सभागृहात विनंती केली. मात्र, त्यांची विनंती सरकारने अमान्य केली. त्यामुळे विरोधकांनी ही सभात्याग केला.

मागील आठवड्यात विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याने संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून अपशब्द वापरल्याने त्यांचे अध्यक्षांनी निलंबन केले होते. त्यानंतर विरोधकांच्या विनंतीनंतरही त्यांचे निलंबन मागे घेण्यास त्यावेळी नकार देण्यात आला.

तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही जयंत पाटलांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत नागपूर आणि मुंबई विधानभवन आवारात प्रवेश करण्यास मज्जाव करणारा ठराव सभागृहात मंजूर करत त्यांचे निलंबन करण्यात आले.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray कडाडले; भाजपने टाकली गुगली, शिंदे गट अडचणीत !

त्यानंतर सोमवारी विधानसभा सभागृहात जयंत पाटील (Jayant Patil) यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ''जयंत पाटील हे ज्येष्ठ सदस्य असून एका पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना एवढी कडक शिक्षा देणे उचित नाही. त्यामुळे ती शिथिल करून मागे घ्यावी आणि त्यांना सभागृहात येण्यास परवानगी द्यावी'', अशी विनंती पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणले तर हे होऊ शकते अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तसेच जयंत पाटील यांचे निलंबन रद्द करून विषय संपवून टाकावा, असेही पवार यावेळी म्हणाले.

मात्र आज मुख्यमंत्री सभागृहात नाहीत, त्यामुळे ते आल्यानंतर याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात देत पाटील यांचे निलंबन रद्द करण्यास नकार दिला. यावर नाराज झालेल्या विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com