Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतून कोण, जयंत पाटील की अजित पवार? प्रवक्ते म्हणतात...

Pravin Kunte Patil : दोन नेत्यांमध्ये तुलना न करण्याचे आवाहन केले आहे.
Ajit Pawar, Pravin Kunte Patil and Jayant Patil
Ajit Pawar, Pravin Kunte Patil and Jayant PatilSarkarnama

Jayant Patil and Ajit Pawar News : भावी मुख्यमंत्री, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बॅनर्समुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेतेसुद्धा भावी मुख्यमंत्र्यांबद्दल विविध विधाने करून हा मुद्दा ताजा ठेवण्याचे काम करीत आहेत. (It has been urged not to compare the two leaders)

किमान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तरी असे करू नये आणि या विषयावर आता पडदा टाकावा, यासाठी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी एक प्रयत्न केला आहे. ट्विट करून त्यांनी दोन नेत्यांमध्ये तुलना न करण्याचे आवाहन केले आहे. ज्या नेत्यांच्या नावाने बॅनर्स लावण्यात आले, ते देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना असे बॅनर्स न लावण्याचे आवाहन केले आहे. पण तरीही काही उत्साही कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, असं दिसतंय.

या राजकीय परिस्थितीत कुंटे पाटील यांनी सूचक असे ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘जयंत पाटील व अजित दादा दोघेही पक्षाचे आधारस्तंभ असून दोघांचीही बलस्थाने वेगवेगळी आहेत. दोघांमध्येही राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असून उगाच तुलना करून माध्यमांनी गैरसमज पसरवू नये. पवार साहेब निर्णय घेण्यास सक्षम आहेत, हे ध्यानात घ्यावे.’ त्यावर दोन्ही नेते पवारांच्या तालमीत वाढलेले आहेत, त्यामुळे तुलना नकोच. पवारांचा निर्णय सर्वतोपरी असताना माध्यमांतील चर्चांना काही अर्थ अशा प्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत.

काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण १४५ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही. त्यामुळे जरी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले तर ते मनावर घेऊ नका. त्या पोस्टरला फार महत्त्व देऊ नका, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.

Ajit Pawar, Pravin Kunte Patil and Jayant Patil
Pusad APMC Election : पुसदच्या इतिहासात प्रथमच ‘या’ आमदारांनी दिले मनोहर नाईकांना आव्हान!

हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही. पण, हा प्रकारच अयोग्य असल्याची नाराजी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली होती. माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? असा सवालही त्यांनी केला होता.

नेत्यांच्या विनापरवानगीने हा प्रकार सुरू असावा. पण ज्यांच्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स लावले गेले, त्या नेत्यांनीच नाराजी दर्शवल्यावर तरी कार्यकर्त्यांनी समजून जायला पाहिजे होते. पण तसे न होता नंतर नंतर हा प्रकार वाढतच गेला. अशा बॅनरबाजीला काहीही अर्थ नाही. असेच सर्व नेत्यांचे मत आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) उगाच तुलना करू नये, असे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com