Dipali Sayyed, Ajit Pawar, Uddhav Thackeray
Dipali Sayyed, Ajit Pawar, Uddhav ThackeraySarkarnama

Dipali Sayyed News: ''अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगलं बोलतात,मात्र...''; दीपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिवसेनेचा वापर सगळीकडे होत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या कुठे आहे ?

Dipali Sayyed On Ajit Pawar : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर येऊन काम करायला पाहिजे होते. ते जनतेमध्ये जाणे अपेक्षित होते. मात्र, ते घराच्या बाहेर पडले नाही. आता निघत आहे. आधी सगळ्यांना पळवतात आणि मग स्वतः निघतात. तेव्हा जर त्यांनी सातत्य ठेवलं असतं तर परिस्थिती वेगळी असती असं विधान शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

दीपाली सय्यद (Deepali Sayed) महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे, शिवसेना, महाविकास आघाडीवर भाष्य केलं. सय्यद म्हणाल्या, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात. शिवसेनेचा वापर सगळीकडे होत आहे.

मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या कुठे आहे असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षवाढीसाठी आधीच प्रयत्न केले असते तर पक्ष कुठल्या कुठे गेला असता. मात्र, आता वेळ निघून गेली आहे अशी टीकाही सय्यद यांनी ठाकरेंवर केली.

Dipali Sayyed, Ajit Pawar, Uddhav Thackeray
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार; ईडीच्या कारवाईनंतर सहकार विभागाचाही 'हा' महत्वपूर्ण आदेश

अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगलं बोलतात. मात्र...

अजित पवार(Ajit Pawar) शिवसेनेबद्दल खूप चांगले बोलतात. मात्र, मला एक दिवस म्हणाले की, काम मलाच करावे लागत आहे. शिवसेना काहीच करत नाही असा गौप्यस्फोटही सय्यद यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद दिले आणि बसवून ठेवले. मात्र, त्यावेळी बाहेर काम कोण करत होते असा सवालही उपस्थित केला आहे.

म्हणून दंगली घडविण्याचं काम केलं जातंय...

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. त्यामुळे सगळीकडे केवळ दंगली घडविण्याचे काम केले जात आहे असा हल्लाबोल करतानाच सय्यद यांनी आपल्याकडील सगळं गेल्यानंतर ती गोष्ट परत कशी मिळणार? असा सवालही उपस्थित केला आहे.

Dipali Sayyed, Ajit Pawar, Uddhav Thackeray
Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

महिलांच्या कुस्तीसाठी पुढाकार घेणार...

महिला महाराष्ट्र केसरीसाठी मोठा पाठपुरावा केला आणि काल आदेश निघाले याचा आनंद आहे. ६५ वर्षांनंतर आता महाराष्ट्र केसरी महिलांसाठी होत आहे. ही स्पर्धा कोल्हापूरला व्हायला पाहिजे. आपल्या महिला बाहेर जाऊन ऑलिंपिक खेळतात, मात्र महाराष्ट्रात स्थान नाही. त्यामुळे महिलांच्या कुस्तीसाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगतानाच आपण राजकारणात सक्रिय असल्याचंही दीपाली सय्यद म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com