अजित पवार म्हणाले, आमची सारखी-सारखी परीक्षा नका हो घेत जाऊ..

अजित पवार, (Ajit Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते तो माल संबंधित व्यापाऱ्याच्या सुपूर्द करण्यात आला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र पोलिसांचे आपल्या देशासह जगभरात मोठे नाव आहे. ते तुमची सुरक्षा करतील, यात तीळमात्र शंका नाही. सरकार म्हणून तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे, आम्ही ती पार पाडतच आहो. पण तुम्ही सारखी सारखी आमची परीक्षा नका घेत जाऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

झाले असे की, नागपुरातील (Nagpur) सराफा व्यापाऱ्याचे सोने आणि चांदी असा ३ कोटी रुपयांचा माल चोरीस गेला होता. पोलिसांनी वेगवान तपास करून अवघ्या २७ तासांत चोरांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला. आज अजित पवार (Ajit Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या हस्ते तो माल संबंधित व्यापाऱ्याच्या सुपूर्द करण्यात आला. सराफा व्यापाऱ्यांचे सोने परत केल्यानंतर आता त्यांना घरापर्यंत जाण्यासाठीही सुरक्षा द्या, नाही तर... असा सल्ला देत, व्यापाऱ्यांनीही आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी सभागृहात हंशा पिकला. यावेळी दुकानात नोकर नेमताना त्याचे पोलिस वेरिफिकेशन करा, सीसीटीव्ही कॅमेरा लावा, जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे सांगून आमची सारखी सारखी परीक्षा घेऊ नका असा टोला त्यांनी लगावला. यानंतर सराफा ओळीतील व्यापाऱ्यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलिस आयुक्तांचाही सत्कार केला. संचालन पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी केले.

पोलिस कल्याणासाठी निधीची कमी नाही..

पोलिसांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही. जवळपास १ हजार कोटींची तरतूद करण्याचा आमचा मानस आहे. केवळ इतकेच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीमधूनही प्रत्येक पालकमंत्री २ ते १० कोटींपर्यंत निधी देत आहेत. त्यातून अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टॉलरन्स : दिलीप वळसे पाटील

अंमली पदार्थांमुळे देशातील तरुण पिढी वाया जाते आहे. त्यामुळे पोलिसांनी अंमली पदार्थ व त्या व्यवसायातील गुन्हेगारांप्रति झिरो टॉलरन्स बाळगावा, असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच काही घटक राज्यात सामुदायिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, राज्य पोलिस दल सक्षम असून तसे काहीच होणार नाही, असा राजकीय टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Ajit Pawar
Video: "तुला काही घर नाही का बाबा, चांगलं वातावरण का खराब करताय",अजित पवार

नागपूरसाठी निधी द्या : नितीन राऊत

अजित दादा तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही पुण्यात बरीच कामे करता, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्रीही आहात. नागपुरातील अनेक कामांसाठी निधी अपुरा पडतो आहे, त्याकडेही लक्ष द्यावे, असा टोला नितीन राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच शहरातील गुन्ह्यांची व्याप्ती वाढली असून आता शहरात पोलिस विभागाचे दोन झोन वाढवून द्यावेत, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in