Satyajit Tambe News : तांबेंचं 'पितळ' उघड ; अजितदादांनी केला थोरातांबाबत मोठा गौप्यस्फोट

Satyajit Tambe News : 'सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe News Sarkarnama

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये काँग्रेसमधील (Congress) गोंधळ समोर आला. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपचाच हात असल्याची चर्चा सुरू आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये असलेला वाद चव्हाट्यावर आला असून युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

"नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ", अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पदवीधरबाबत अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.दुसरीकडे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या घडामोडींवर भाष्य करीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Satyajit Tambe News
Vikhe : विश्‍वासघात झाला की थोरातांच्या संमतीने अपक्ष उमेदवारी केली? मंत्री विखे-पाटलांचे प्रश्‍नचिन्ह

'सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत अजित पवार म्हणाले,"सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत नाशिकमध्ये काहीतरी गुपित शिजतयं याची माहिती मिळाली होती, याबाबत मी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली होती पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,"

डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना त्यांनी ती मागे घेतली. त्याजागी सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते असा दावा केला जात आहे.

Satyajit Tambe News
Koyta Gang News : पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा कित्ता पिंपरीचे नवे आयुक्त गिरवतील का ?

सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून अर्ज न भरता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. दुसरीकडे तांबेंनी पाठिंबा मागितला तर आम्ही द्यायला तयार आहोत, अशी भूमिका भाजपाने मांडली. त्यामुळे काँग्रेसने लागलीच तांबेंकडचा पाठिंबा काढून घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवले असून सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.'जे घडलं ते चांगलं नाही,' अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त करीत नाराजी बोलून दाखवली. लवकरच सुधीर तांबे यांच्यावर पक्ष कारवाई करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com