Ajit Pawar News : नागपूरच्या सभेत अजित पवार बोलले नाहीत, मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांचीच…

Nagpur : सभेत अजित पवार यांनी भाषण केले नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दुसऱ्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाषण केले नाही. तसे काल सकाळीच त्यांनी सांगितले होते. सभेत एक शब्दही ते बोलले नाहीत, मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावर चर्चा मात्र त्यांचीच होती. (He did not speak a single word in the meeting)

काल सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, आजच्या सभेसाठी आमचं ठरलं आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील दोन - दोन नेते भाषण करणार आहेत. मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत भाषण केले होते. त्यामुळे आजच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख भाषण करणार आहेत. त्याप्रमाणे या दोन नेत्यांची भाषणे झाली.

वज्रमूठ सभा सुरू असताना ‘एकच वादा - अजित दादा’च्या घोषणा व्यासपीठाच्या डाव्या बाजूने येत होत्या. अजित दादांनी भाषण करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, असे तेथून माहिती घेतल्यावर कळले. पण चर्चा होती ती अजित दादा ३५ ते ४० आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार, याची. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याची पूर्ण तयारी केली आहे, अशी चर्चा मैदानावर सुरू होती.

मागील आठवड्यात अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. तेव्हा ते भाजपमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. त्या काळात त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचेही सांगितले जाते. पण त्यानंतर ते पुण्यात एका शॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पोहोचले. त्यानंतर या चर्चांना विराम मिळाला होता. पण काल नागपुरातील वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते आले होते. मात्र चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाजपमध्ये जाण्याचीच.

Ajit Pawar
Prakash Ambedkar यांचे मोठे वक्तव्य ; इशारा कोणाकडे ? |Maharashtra Politics | Ajit Pawar| Sarkarnama

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून भाजपसोबत गेले. त्यांच्यासोबत मूळ शिवसेनेतले ४० आमदारही गेले. त्यानंतर राज्यभर त्यांना गद्दार-गद्दार म्हणून हिणवण्यात आले. पुढील निवडणुकीमध्ये त्या ४० पैकी फार फार तर पाच ते सात जण निवडून येतील. बाकीच्यांना मतदार घरी बसवतील, असेही सांगितले जात आहे. त्यातच शिंदे गटातील काही नेत्यांनी अजित पवारांची प्रशंसा करणे सुरू केले आहे. याचाही थेट अर्थ अजित दादा भाजपसोबत जाण्याशी जोडला जात आहे.

अजित पवारांची (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचे असेल तर अशीच काहीतरी तडजोड - जोडतोड करावी लागणार आहे आणि त्या दिशेने त्यांनी काम सुरू केले आहे. आगामी काही दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होतील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वर्तविले आहे. त्यांच्या वक्तव्याचाही संबंध अजित दादांच्या भाजपमध्ये जाण्याशी जोडला जात आहे. एकंदरीतच काय तर नागपुरातील कालच्या सभेत अजित दादा एक शब्दही बोलले नाहीत, मात्र चर्चा त्यांचीच होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com