अजितदादांचं बावनकुळेंना थेट आव्हान : 'मनावर घेतलं तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन'

संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी एखाद्याला चॅलेंज दिलं ना.....
Chandrashaekhar Bawankule-Ajit Pawar
Chandrashaekhar Bawankule-Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : राज्यात सप्टेंबरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) -देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करण्याची वल्गना करतात. बारामतीत आमचं काम आहे. मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन, असे खुले आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना दिले. (Ajit Pawar challenges Chandrashaekhar Bawankule)

भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघ लढविण्याची घोषणा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बारामतीत घड्याळ बंद करण्याची घोषणा केली हेाती. विधानसभेत आज बोलत असताना अजित पवार यांनी ती गोष्ट बोलून दाखवत थेट बावनकुळे यांनाच आव्हान दिले.

Chandrashaekhar Bawankule-Ajit Pawar
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह इंच न इंच जमीन महाराष्ट्रात आणू : विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यात सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपच्या एका नेत्याने बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना केली. पण, बारामतीत आमचं काम आहे. जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी एखाद्याला चॅलेंज दिलं ना. तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही.

Chandrashaekhar Bawankule-Ajit Pawar
राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला करूनही गुन्हा दाखल नाही : सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणावं जरा दमानं, दमानं घ्या. पण, गाडी एकदम फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधी अपघात होईल, कोलमडून पडेल, हे कळायचं पण नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com