Ajit Pawar In Vajramuth Sabha: वज्रमूठ सभेला अजित पवार उपस्थित राहिले; पण केवळ 'या' अटीवर !

Vajramuth Sabha News: सभा सुरू झाल्यानंतर अकोल्याचे नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्याचे जितेंद्र आव्हाड यांची भाषणे झाली.
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama

Nagpur News : नागपूरमध्ये शनिवारी (१५ एप्रिल) झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत सगळ्याच लहानमोठ्या पक्षांच्या नेत्यांची भाषणे झाली. पण विरोधी पक्षनेते अजित पवार व्यासपीठावर असूनही त्यांचे भाषण झाले नाही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभेत भाष का केले नाही, याचे कारण समोर आले आहे. (Ajit Pawar attended the Vajramuth meeting on one condition)

अजित पवार न बोलण्याच्या अटीवरच सभेला आले होते, असे सांगितले जात आहे. खरतरं नागपुरातील वज्रमूठ सभेच्या आधी अजित पवार 'नॉट रिचेबल' असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे ते सभेला येणार की नाही, यावरुनही प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पण अजित पवार सकाळीच नागपुरात दाखलं झाले. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना न भेटल्याचाही खुलासा केला. (Maharashtra Politics)

Ajit Pawar News :
Nanded Market Committee : आघाडीकडून लढण्यासाठी इच्छूकांची गर्दी, तर भाजप-शिंदे युतीचा नाराजांवर डोळा..

त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच ते सभेच्या ठिकाणी पोहचले. सभा सुरू झाल्यानंतर अकोल्याचे नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्याचे जितेंद्र आव्हाड यांची भाषणे झाली. पण अजित पवार यांनी भाषण न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. (Vajramuth Sabha)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सभेचे संयोजक सुनील केदार यांनी आग्रह केल्यानेच पवार नागपुरात आले होते. मात्र, 'मी सभेत बोलणार नाही', ही अटही त्यांनी घातली होती. सभेच्या व्यासपीठावर अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसले होते आणि दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com