पत्रकार परिषदेला अजित दादा अनुपस्थित, महाविकास आघाडीत बिघाडी ?

Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्वाचे नेते अजित दादा नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Mahavikas Aghadi News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज दाखल करणे आणि माघार घेण्याच्या दिवसापर्यंतही महाविकास आघाडीचे काही ठरले नव्हते. अखेरीस आज कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचे, हे ठरले. पण यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार अनुपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्वाचे नेते अजित दादा (Ajit Pawar) नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाली, अशा चर्चा सुरू झाल्या. महाविकास आघाडीच्या आधी कॉंग्रेसमध्येच (Congress) मोठा बिघाड झाला होता. नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनसुद्धा त्यांनी नामांकन दाखल केले नाही, तर त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

कॉंग्रेसला आधी या परिस्थितीतून बाहेर निघायचे होते, त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायचे होते. कालपर्यंत कॉंग्रेसचा घोळ संपलेला नव्हता. तो संपल्यानंतर मुंबईत काल रात्री एक बैठक झाली. पण त्यात निर्णय झाला नाही. उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत बोलून निर्णय जाहीर करू, असे नाना पटोले यांनी काल सांगितले होते. त्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घ्यायचे ठरले. पण पत्रकार परिषदेच्या वेळाबाबतही नेत्यांनी घोळ घालून ठेवला. त्यामुळे पत्रकारही ताटकळत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar News; ...आता अजित पवार देणार तांबेंना शह?

आधी दुपारी १२ वाजताची वेळ दिली होती. पण १ वाजून गेल्यानंतरही पत्रकार परिषद सुरू झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अजूनही एकवाक्यता नाही, अशी चर्चा सुरू झाली. ‘यांना साधी पत्रकार परिषदेची वेळ ठरवता येत नाही, तर उमेदवार काय ठरवणार?, असेही प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागले. दुपारी २ वाजताच्या सुमारास अखेर पत्रकार परिषद सुरू झाली. पण यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार नसल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com