अजितदादांनी नागपुरात जावून मानले देवेंद्र फडणविसांचे आभार…

अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला.
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : नागपुरात सिव्हिल लाइन्स येथे पोलिस भवन या भव्य इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अजित दादांनी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

पोलिस भवनाचे रितसर लोकार्पण केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, या भव्य व सुंदर इमारतीच्या भूमिपूजनापासून तर उद्‍घाटनापर्यंत ज्यांनी ज्यांनी पोलिस भवन उभारण्यासाठी सहकार्य केले, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. या कामात सहकार्य लाभलेले सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सर्वांचेच या सुबक कामासाठी आभार मानतो. यावेळी त्यांनी प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नावाचा उल्लेख केला. या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते २०१८ साली करण्यात आले होते.

पोलिस आयुक्तालयाद्वारे सिव्हिल लाइन्स येथील भव्य अशा पोलिस भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक विवेक फनसाळकर, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस अधीक्षक विजय मगर उपस्थित होते.

राजकीय दबावाला बळी पडू नका..

देशात महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा चांगली आहे. तेव्हा काम करीत असताना कोणत्याही सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय दबावाला बळी पडून तपासाकडे दुर्लक्ष करू नका. आपले काम निष्पक्ष पार पाडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नाहीतर इकडं हा सत्ताधारी अन् तिकडं तो सत्ताधारी, असे करून आपले काम प्रभावित होऊ देऊ नका, असेही ते म्हणाले.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
अजित पवार म्हणाले, लाऊडस्पीकर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक

वरिष्ठांना टोले..

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी नीट वागावे. अधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी नेमणूक मिळते तेव्हा ती नेमणूक काही काळासाठी असते. बदलीनंतर आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याबाबत चांगल्या आठवणी ठेवाव्यात, अशी वागणूक आपण त्यांना द्यायला हवी, असा टोला अजित पवारांनी पोलिस विभागातील खऊट वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com