Ajit Pawar : अजित दादा म्हणाले सत्ताधाऱ्यांना, हे वागणं बरं नव्हं..!

मानवनिर्मित प्रकार आता सरकारने थांबवले पाहिजे. त्या परिसरातील शेती पुढील काही वर्ष नापिक राहणार आहे, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात चौफेर फटकेबाजी केली. दरम्यान त्यांनी सरकारला कधी प्रश्‍न केले, कधी चिमटे घेतले, तर प्रसंगी सल्लाही दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे आमच्या सोबत होते, ते आता सरकारमध्ये आहेत आणि आम्ही विरोधात बसलो आहोत. पण आमच्यासोबत ‘असं वागणं बरं नव्हं...’, असं म्हणत अजित दादांनी सरकारला चिमटा काढला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) आपण सोबत असताना जे निर्णय घेतले, कमीत कमी ते तरी बदलू नका, अशी आर्त मागणी अजित दादांनी केली. आपण मिळून घेतलेल्या निर्णयांनाही या सरकारने स्थगिती दिली, याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कुणावर, केव्हा, कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. कदाचित उद्या पुन्हा आपल्यालाच एकत्र येण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे असं वागणं बरं नव्हं, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

दादाजी भुसेंवर का अन्याय का केला ?

संकट येते तेव्हा राज्याच्या प्रमुखांना जावंच लागतं. तुम्ही गेले ते तुमचं कामच आहे. तेव्हा सिरोंचाला जाताच येत नव्हते, दळणवळण बंद होते. हेलिकॉप्टरही जाऊ शकत नव्हते. त्यामुळे दोघेही परत फिरले. एनडीआरएफच्या दुप्पट जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सोयाबीनचा खर्च ११७०० रुपये आणि कापसाचा ११,५०० रुपये प्रति एकरी येतो. असे असताना हेक्टरी १३६०० जाहीर केले. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. दादाजी भुसे चांगले कृषिमंत्री होते, दादाजी भुसेंवर (Dadaji Bhuse) का अन्याय केला, हे कळत नाही.

यवतमाळ जिल्ह्याच्या वणीमध्ये भीषण स्थिती..

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. खरीप तर गेलेलंच आहे. शेतकरी रब्बीची वाट बघत आहेत. रब्बीच्या हंगामात पाऊस पडत नाही. याचाही विचार झाला पाहिजे. वणी, यवतमाळमध्ये आम्ही पाहणी केली. वेकोलिच्या खाणींमुळे निघालेल्या मातीचे ढीग डोंगरांयेवढे आहे. माती शेतकरी सांगतात की गेल्या ५० वर्षांपासून येवढे पाणी शेतांत कधी आले नाही. आता वेकोलिनिर्मीत मातीच्या डोंगरांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.

Ajit Pawar
अजित दादा म्हणाले, आमदार किशोर जोरगेवार यांची ‘ती’ मागणी योग्यच !

चंद्रपूरात जोरगेवार, मुनगंटीवार, धानोरकर होते..

चंद्रपूर जिल्ह्यात पाहणीसाठी गेलो असताना आमदार किशोर जोरगेवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार बाळू धानोरकर होते. तेथे इरई नदीवरचे धरण ऊर्जा विभागाने बांधले आहे. पण ऊर्जा विभागाची घाण नदीत टाकली जाते. पाणी वहन क्षमता संपलेली आहे. शहरांतही जुन्या इमारतींचा मलबा नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये टाकला जातो. परिणामी पात्र उथळ होतात आणि झाडं झुडपं वाढतात. काहींचे दीड-दीड मजले पाण्याखाली गेले होते. परवानगी नसताना प्लॉट पाडण्याचे काम चंद्रपुरात सुरू होते.

बावनकुळेंच्या कोराडीतही तलाव फुटला..

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या परिसरात कोराडी पॉवर प्लांटचा राखेचा तलाव फुटला, पाच-सहा गावांना त्याचा प्रचंड फटका बसला. मानवनिर्मित प्रकार आता सरकारने थांबवले पाहिजे. त्या परिसरातील शेती पुढील काही वर्ष नापिक राहणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com