अजित दादा म्हणाले, आमदार किशोर जोरगेवार यांची ‘ती’ मागणी योग्यच !

त्या मागणीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले आहे. नव्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar News, Kishor Jorgewar News
Ajit Pawar News, Kishor Jorgewar NewsSarkarnama

नागपूर : दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन (Winter session) झालेले नाही. त्यामुळे आता होणार असलेले पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी सभागृहात बोलताना केली होती. त्या मागणीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले आहे. नव्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.(Ajit Pawar News in Marathi)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) नगरीत नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन घेतले जाते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० चे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले नाही. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र ते अधिवेशनही मुंबईतच घेण्यात आले. विदर्भातील कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकऱ्यांचा आत्महत्या, रस्त्यांची दुर्दशा, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास विदर्भातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे.

उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा अनुशेष सर्वाधिक आहे आणि तो भरून काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भातील जनता दरवर्षी नागपूर अधिवेशनाची आतुरतेने वाट बघत असते. त्यांना राज्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या मुंबईकडे दरवेळी प्रवास करणे शक्य नसल्याने नागपूर अधिवेशनात त्यांना आपले प्रश्न मांडता येतात. नागपूर करारानुसार काही काळासाठी सरकार नागपुरात आणले जाईल आणि राज्य कायदेमंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात होईल, आणि किमान ६ आठवड्याचे विधानसभेचे सत्र नागपुरात होईल, असे करारानुसार ठरले आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

Ajit Pawar News, Kishor Jorgewar News
उत्साहाचा खळाळता झरा म्हणजे, आदरणीय अजित दादा…

राहुल नार्वेकर यांची मतदान प्रक्रियेने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी शुभेच्छा प्रस्तावावर बोलत असताना आमदार जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. तर काल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिले अधिवेशन झाले आणि त्यांनंतर मार्च महिन्यात कोरोना आला. त्यामुळे नागपुरात अधिवेशन झालेच नाही. झाली ती केवळ एक दिवस पाच दिवस अशा प्रकारे पार पडलीत. जोरगेवार यांनी नागपूरला दरवर्षी अधिवेशन झाले पाहिजे, अशी मागणी केली. मात्र कोरोनामुळे नागपुरात अधिवेशन घेता आली नाही. याची खंत व्यक्त करत या संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे बोलत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीचे समर्थन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com