अग्नीपथ योजना : नरेंद्र मोदी ‘कांचा चिना’ आहेत का ?

अग्नीपथ योजनेच्या (Agnipath) विरोधात आज नागपुरात (Nagpur) युवक कॉंग्रेसतर्फे (Youth Congress) आंदोलन करण्यात आले.
अग्नीपथ योजना : नरेंद्र मोदी ‘कांचा चिना’ आहेत का ?
Youth Congress Agitation in NagpurSarkarnama

नागपूर ः अग्नीपथ ही योजना देशातील तरुणांना आणि एकंदरीतच देशाला डबघाईस आणणारी योजना आहे. सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये ही योजना लागू करण्याचा कट केंद्रातील मोदी सरकारने रचला आहे. १७ ते २१ वयोगटातील मुलांना नोकरीत घेतले जाईल आणि आरएसएसची विचारधारा मानणाऱ्या २५ टक्के युवकांनाच यामध्ये घेतले जाणार आहे आणि हा बेरोजगारांवरील अन्याय आहे, असे युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके म्हणाले.

अग्नीपथ योजनेच्या (Agnipath) विरोधात आज नागपुरात (Nagpur) युवक कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. आज देशातील अनेक शहरांमध्ये जाळपोळ होते आहे. देश विनाशाकडे जाताना दिसतो आहे. पण आजच्या या युवक कॉंग्रेसच्या (Youth Congress) आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील लोकांना विनंती आहे की, त्यांनी जाळपोळ करू नये. गांधीजींच्या सत्याच्या मार्गाने चालावे लागणार आहे आणि प्रसंगी भगतसींह यांचाही मार्ग अवलंबण्याची वेळ येऊ शकते. पण अग्नीपथ योजनेचा विरोध करताना कुठेही जाळपोळ किंवा हिंसक कारवाया कुणी करू नये, असे आवाहन बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी केले आहे.

शांततेच्या मार्गाने आंदोलन करून केंद्र सरकारला ही योजना मागे घेण्यास आपण भाग पाडू. युवक कॉंग्रेसचे हे काही आजचे आंदोलन नाही, तर देशातील शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमांवर बसला होता, तेव्हा युवक कॉंग्रेस, कॉंग्रेस त्यांच्या सोबत होते. शेतकरी, मजूर, कामगार, महिलांच्या सोबत कॉंग्रेस पक्ष नेहमीच राहिला आहे. याही वेळी देशातील बेरोजगारांच्या पाठीशी युवक कॉंग्रेस उभी आहे. जोपर्यंत ही योजना मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत युवक कॉंग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही शेळके म्हणाले.

अग्नीपथ नावाचे दोन सिनेमे आहेत. पहिल्या सिनेमात डॅनी तर दुसऱ्या सिनेमात अभिनेते संजय दत्त हे कांचा चिनाच्या भूमिकेत होते. त्यात मांडवा नावाचे एक गाव होते, तेथे अंमली पदार्थ तयार केले जात होते. अग्नीपथ योजनेवरून नरेंद्र मोदी स्वतःला कांचा चिनी समजत आहेत काय, असा प्रश्‍न आज आम्हाला पडला आहे. आपला देश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. पण केंद्रातील मोदी सरकार या देशाला मांडवा बनवण्याच्या मागे लागले आहेत की काय, असे आता वाटू लागले आहे.

Youth Congress Agitation in Nagpur
युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात

दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्यात आले होते, त्याचप्रमाणे ही अग्नीपथ योजनाही रद्द करावी, अशी युवक कॉंग्रेसची मागणी आहे. जर का केंद्र सरकारने हा विषय ताणून धरला, तर आम्ही अखेरपर्यंत पाठपुरावा करू, पण ही अन्यायकारक योजना रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असे बंटी शेळके ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in