ईडी कार्यालयावर धडकले आक्रमक कॉंग्रेस नेते, मोदींच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी...

ईडी (सक्त वसुली संचालनालय) कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करीत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
Congress Leader's agitation against PM Narendra Modi
Congress Leader's agitation against PM Narendra ModiSarkarnama

नागपूर : अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स दिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने (Congress) आज देशभर तीव्र आंदोलन केले. आज नागपुरात ईडीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेस नेते आक्रमक झालेले बघायला मिळाले.

ईडी (सक्त वसुली संचालनालय) (ED) कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करीत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार (BJP Governemnt) व मोदी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. भाजप व केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर सुरू असून ते कॉंग्रेस व गांधी कुटुंबीयांवर सूड उगवत आहेत, असे कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है आणि सोनियाजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे. सोनिया गांधींना जो त्रास दिला जात आहे, त्याचा विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचा लहान मोठा कार्यकर्ता आज येथे आलेला आहे. जोपर्यंत गांधी कुटुंबाच्या मागील चौकश्‍यांचा ससेमिरा हटणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार असल्याचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यावेळी म्हणाले. राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या नेतृत्वात आजचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहराध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष नॅश नुसरत अली यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Congress Leader's agitation against PM Narendra Modi
Nana Patole : देशात काॅंग्रेस आजही बापच, सुजय विखे अजून लहान..

आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई जोपर्यंत थांबवली जाणार नाही, तोपर्यंत कॉंग्रेसचा एकही कार्यकर्ता मागे हटणार नाही. त्यामुळे सूडबुद्धीने सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवावी, असे आमदार अभिजित वंजारी म्हणाले. केंद्र सरकार जोपर्यंत ईडीचा गैरवापर थांबवणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. उलट याची तीव्रता अधिक वाढत जाईल. या देशातील लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. अशा प्रकारे हुकूमशाहीतून देश चालत नाही, तर लोकशाहीतून देश चालत असतो. लोकशाहीला दाबण्याचं काम भाजप ईडीसारख्या संस्थांच्या माध्यमातून करीत असल्याचा आरोप माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in