Eknath Shinde : दिल्लीचे मिंधे-एकनाथ शिंदेच्या विरोधात एयू-एयू कौन है, घोषणांनी दणाणला परिसर...

Assembly Building : विधानभवन इमारत परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
Winter Session
Winter SessionSarkarnama

Assembly Winter Session News : विधिमंडळाची विशेष बैठक झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना प्रत्युत्तर देत सत्ताधारीही मग मैदानात उतरले. यामुळे विधानभवन इमारत परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

दिल्लीचे मिंधे - एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) भ्रष्टाचाराचे खोके - मुख्यमंत्री (Chief Minister) ओके, ५० खोके - भूखंड ओके, राज्यपाल (Governor) हटाव-महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर श्रीखंडाचा मोठा डोक्यावर घेऊन परिसरात श्रीखंड वाटले. भूखंडाचे श्रीखंड सर्वांनी खावे, असे सांगत श्रीखंडाचे वाटप विरोधकांनी केले. हे सुरू असतानाच सत्ताधारी मैदानात उतरले आणि एयू एयू कौन है, मुंबईकरांना (Mumbai) अपमानित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा त्रिवार निषेध, मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणणाऱ्यांचा निषेध आदी घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

५० खोके-एकदम ओके, ही घोषणा जुनी झाली म्हणून ५० खोके-भूखंड ओकेच्या घोषणा देत आहोत, असे विरोधकांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कामच करीत नाहीत, तर केवळ दिल्लीश्‍वरांच्या आदेशांचे पालन करीत आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचा एकही मुख्यमंत्री अशा प्रकारे दिल्लीचा मिंधा झाला नव्हता. पण एकनाथ शिंदेंनी गद्दारी केल्यानंतर हे सुद्धा करून दाखविले. त्यामुळे दिल्लीचे मिंधे-एकनाथ शिंदे, म्हणत आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.

Winter Session
Eknath Shinde News: सीमावादावर ठराव मांडणारे एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री, कोणते मुद्दे मांडणार?

एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल संसदेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या मोबाईल फोनवर एयू नावाचे मिस्ड कॉल असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आज एयू एयू कौन है, असा प्रश्‍न विचारत सत्ताधारी विरोधकांवर बरसले. या प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत येणार असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकाच वेळी परिसरात घोषणा देत आमने-सामने आले. त्यामुळे काह काळ अभूतपूर्व गोंधळ उडाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com