कळमना-पारडी उड्डाणपूल भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीनंतर पिरिपाही मैदानात...

पुलाच्या कामात असलेल्या संथ गतीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यानेच पूल कोसळल्या गेल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे Jaydeep Kawade यांनी केले.
Kalamana-Pardi Fly Over
Kalamana-Pardi Fly OverSarkarnama

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतिशय संथगतीने तयार होत असलेला उपराजधानीतील कळमना-पारडी उड्डाणपुलाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. कारण, जवळपास साडेचार वर्षाचा कालावधी लोटला तरी पूल बनणार की नाही, अशी शंका शहरासह पूर्व नागपुरातील जनतेला आधीच होती. मात्र, मंगळवारी रात्रीला चिखली चौक ते एचबी टाऊन पारडी मार्गावरील पुलाचे दोन खांब अचानक कोसळले. यात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. परंतु, पुलाच्या कामात असलेल्या संथ गतीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यानेच पूल कोसळल्या गेल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले.

कवाडे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपराजधानीतील कळमना-पारडी उड्डाणपुलाचे ऑगस्ट 2014 मध्ये थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले. मात्र, 22 महिन्यानंतर जून 2016 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जून 2019 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन सुध्दा देण्यात आली. परंतु, तब्बल 52 महिने लोटल्यानंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास आला नाही. आजही केवळ 60 ते 65 टक्केच पूल तयार झाले नाही. याशिवाय गेल्या साडेचार वर्षांपासून पुलाच्या बांधकामामुळे अनेक रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

मंगळवारी झालेल्या दुर्दैवी घटनेत जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुलाचे जे पिल्लर कोसळले, यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह नेते मंडळी सुध्दा जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह स्थानिक जनप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असेही ते म्हणाले. काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हा पूल कोसळल्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने घटनास्थळावर आक्रमक आंदोलन केले. या पुलाच्या बांधकामातील भ्रष्टाचाराला एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांनीच कंत्राटदारांना वेळोवेळी क्लिन चिट दिली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार म्हणाले.

Kalamana-Pardi Fly Over
"आरएसएस' नक्षलवादा पेक्षाही भयानक : प्रा. जोगेंद्र कवाडे 

52 महिन्यांचा कालावधी लोटला

खरे तर 21 ऑगस्ट 2014 मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, 448 कोटी रुपयांच्या किमतीसह मार्च 2016 मध्ये काम सुरू करण्यात आले. जून 2019 मध्ये उड्डाणपूल तयार होण्याचे स्वप्न 2020 संपल्यावरही पूर्ण झाले नाही. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2021 पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले. मात्र, या पुलाच्या बांधकामाला 52 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच मंगळवारच्या घटनेमुळे या पुलाला 2022 वर्ष पहावे लागणार असेच वाटते आहे. लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे राजकीय नेते नागरिकांना स्वप्न दाखविणे थांबवत नसल्याची आजची स्थिती आहे. दुसरीकडे अपूर्ण कामांमुळे पूर्व नागपूरकर वैतागले आहेत. जनतेच्या या त्रासाला लवकरात लवकर प्रशासनाने दूर करावे, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी लवकरच जनआंदोलन उभारणार असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com