शिवसेनेत अखेर फूट पडलीच, मुंबईत पोहोचलेले ते २६ जण शिंदे गटात !

काही दिवसांपूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले.
Akola's Shivsainiks with Eknath Shinde
Akola's Shivsainiks with Eknath ShindeSarkarnama

अकोला : मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे गटाने अखेर अकोला (Akola) जिल्हा शिवसेनेत (Shivsena) फूट पाडण्यात यश मिळविले. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे आमदार पुत्र विप्लव बाजोरिया व माजी नगरसेवकांसह २६ जणांनी आज मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर तत्काळ बाजोरिया यांची अकोला जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले. त्यांच्यासोबत कोण जाणार याबाबत उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी बाजोरिया पिता-पुत्र व त्यांच्यासोबत युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवकांसह शशिकांत चोपडे, अश्विन नवले, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल आदींसह एकूण २६ जण मुंबईत दाखल झाले होते.

या सर्वांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईत सह्यांद्री अतिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व त्यांचे आमदार पुत्र विप्लव बाजोरिया, युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, योगेश अग्रवाल यांच्‍यासह माजी नगरसेवक व इतर सर्वांचे स्वागत केले.

Akola's Shivsainiks with Eknath Shinde
नाशिकच्या बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळ देणार

मुख्यमंत्री शिंदे यांनी अकोला जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी बाजोरिया यांच्याकडे सोपवत असल्याचे जाहीर केले. अकोला जिल्ह्यात पक्ष बांधणी सर्व जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. शिंदे गटातील अकोला जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही लवकरच केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in