महाविकास आघाडीनंतर आता जिल्हा परिषदेतही वाहू लागले बंडाचे वारे...

नागपूर जिल्हा परिषदेत (Nagpur ZP) कॉंग्रेसप्रणित महाविकास आघाडीची सत्ता आहे. कॉंग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे.
महाविकास आघाडीनंतर आता जिल्हा परिषदेतही वाहू लागले बंडाचे वारे...
Nagpur ZPSarkarnama

नागपूर : शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. पुढे काय होईल, हे सध्यातरी निश्‍चितपणे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत नागपूर जिल्हा परिषदेतही बंडाचे वारे वाहू लागले आहेत.

सत्तापक्षातील एका सदस्याने उघडपणे अध्यक्षपदावर दावा केला आहे. तो नाकारल्यास सहकाऱ्यांना सोबत घेऊन बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. संबंधित अध्यक्षपदाचा दावेदाराने विरोधकांसोबत चर्चा चालू असून याची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत (ZP) कॉंग्रेसप्रणित (Congress) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आहे. कॉंग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. सर्वांच्या नजरा या अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता असल्याने इच्छुकांनी पद मिळविण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.

काहींनी तर विशिष्ट पदावरच दावा केला आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील एका सदस्याने अध्यक्ष तर उमरेड मतदार संघातील एका सदस्याने उपाध्यक्ष पदावर दावा केला आहे. अध्यक्षपदाचा दावा करणारे सदस्य ज्येष्ठ असून त्यांनी उघडपणे आपली मंशा व्यक्त करून दाखविली आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्यास निवडणुकीत अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. विरोधी पक्षाच्या (भाजप) सदस्यांसोबतही चाचपणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे काही सदस्य नाराज आहे. त्यांनाही हाताशी धरण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. गेल्या अर्थसंकल्पीय सभेत त्यांनी सत्तापक्षालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Nagpur ZP
जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर आगामी निवडणुकांची छाप !

सात ते आठ कॉंग्रेस सदस्यांना जोडण्याचा प्रयत्न..

जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी २९ चा आकडा हवा. कॉंग्रेसकडे ३२ सदस्य तर भाजपकडे १४ सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ८ तर शिवसेना, गोंडवाणा व शेकापचे एक-एक सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य आहे. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचे समर्थन मिळणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता उलटवण्यासाठी कॉंग्रेसमधील ७ ते ८ सदस्यांना बाहेर काढावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in