वर्षावरची स्थिती पाहिली अन् फडणवीस म्हणाले, आशिष मी तुझ्या भावना समजू शकतो…

आमदार जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) म्हणाले, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) उभी केली होती. ती कमकुवत होत असेल, तर ठोस निर्णय घेतला पाहिजे, असे आम्हा आमदारांना सारखे वाटत होते.
MLA Ashish Jaiswal and Devendra Fadanvis
MLA Ashish Jaiswal and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : सुरुवातीला शिवसेनेचे ११ आमदार, मग २०, नंतर ३० आणि अखेरीस ४० आमदार शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या खेम्यात दाखल झाले. कसा झाला हा सर्व प्रवास, कोण कोण, कसा संघर्ष करून गुवाहाटीला पोहोचला, कुणी कशी नाकेबंदी तोडली, याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. रामटेकचे अपक्ष आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी आपला ‘तो’ प्रवास सांगितला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) म्हणाले, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) उभी केली होती. ती कमकुवत होत असेल, तर ठोस निर्णय घेतला पाहिजे, असे आम्हा आमदारांना सारखे वाटत होते. जनतेने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची होती. महाविकास आघाडीमध्ये ते होत नव्हते. त्यामुळे जड अंतःकरणाने सर्व आमदारांनी निर्णय घेतला. हा उठाव करण्याचे काहीही ठरलेले नव्हते. हे टायमिंग कुणाच्याही हाती नव्हते. त्यामुळे कुणी बॅग सोबत घेऊन आलेले नव्हते. २० जून रोजी असं काय घडलं, ते माहिती नाही. पण एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) भावना दुखावल्या, अन् ते निघाले...

त्या २० तारखेची परिस्थिती फार वेगळी होती, संशयास्पद होती. त्याबाबतीत एकनाथ शिंदेच काय ते सांगतील, मी काही बोलणे योग्य होणार नाही. ज्यांनी ज्यांनी मुंबई सोडली त्यांच्याकडे फोन होते, कम्युनिकेशन सुरू होते, गाड्या होत्या. शिंदेंच्या मागे एक-एक करून सर्व निघाले. सर्व जण मागेपुढे पोहोचले आणि बघता बघता १०-१२ आमदारांची संख्या ५० वर पोहोचली (अपक्ष आमदारांसह) ज्याच्या सदसदविवेक बुद्धीला जसं पटलं त्यांनी ते केलं. प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांची वेगळी स्टोरी आहे. मी माझं सांगू शकतो, असे म्हणत आमदार जयस्वाल मग अधिक खुलून बोलते झाले.

गुलाबराव पाटील गेले ॲम्बुलन्सने..

गुलाबराव पाटील ॲम्ब्यूलन्समधून गेल्याचा माहिती नंतर मिळाली. वाय प्लस सुरक्षा असलेले मंत्रीही निघाले. आमदारांना पोलिसांची सुरक्षा होती, येवढ्या मोठ्या संख्येने लोक गेले. कारण कोणी या मुव्हमेंटवर लक्ष ठेवले नाही. हे इंटेलिजन्सचे फेलीवर आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मुख्यमंत्री, गृहमंत्री इंटिलीजेन्सकडून दररोज सकाळी ब्रिफींग घेत असतात. पण त्यांना अहंकार होता. चार-पाच आमदार गेले तर काय फरक पडणार आहे. आपल्याकडे १७० आमदार आहेत, याच भ्रमात ते राहिले. तीच त्यांची धारणा होती आणि तिच त्यांना नडली.

वर्षावरून निघाल्यावर व्यतित झालो होतो..

ज्या दिवशी मी वर्षावरून निघालो तेव्हा लगेच फडणवीसांना (Devendra Fadavis) कॉल केला. त्यांना म्हणालो, मला तेथे जायचे आहे, विनंती केली. वर्षावरची परिस्थिती पाहिली त्यामुळे मनाला फार वेदना झाल्या, असं त्यांना सांगितलं. त्यांना म्हटले की मला दुःख होत आहे. पण आता दुसरा पर्याय नाही. त्यांनी मला दुजोरा दिला. म्हणाले, आशिष मी तुझी भावना समजू शकतो. यापुढे आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही.’ आपल्या आमदारांच्या भावनांचा त्यांनी आदर केला असता, मतदारसंघाबाबत शिवसेनेच्या आमदारांची कळकळ समजून घेतली असती, अगोदरच आघाडीतून बाहेर पडले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. महाभारताच्या युद्धात जी परिस्थिती होती, तीच त्यावेळी होती. प्रत्येकाला निर्णय घ्यावा लागला, असे आमदार जयस्वाल यांनी सांगितले.

MLA Ashish Jaiswal and Devendra Fadanvis
Video: आमदारांना डावलून निधी देणारे तिसमार खान कोण?; आशिष जयस्वाल

आमदार हा साधा माणूस नसतो..

आमदार हा साधा माणूस नसतो, त्याला सर्व छक्के पंजे माहिती असतात, त्याला वाटते तेव्हा तो निर्णय घेतो. मी अपक्ष आहो. आधी आघाडीला पाठिंबा दिला. मतदारसंघाच्या हितासाठी जे वाटलं ते केलं. तेथे निराशा झाली म्हणून मग एकनाथ शिंदेंच्या उठावात सामील झालो. फडणवीसांशी बोलल्यानंतर मी शिंदेंनाही कॉल केला होता, असेही जयस्वाल म्हणाले. हा ज्वालामुखी होता आणि एक ना एक दिवस फुटणारच होता. पण त्याचा काही मुहूर्त ठरलेला नव्हता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला १०-१२ आमदार गेले.

कुणासाठी? तर मायबाप जनतेसाठी..

एक-एक करून सर्वांनीच उठावात सहभागी व्हायचा निर्णय घेतला. यासाठी कुणावरही जबरदस्ती नव्हती. सुरत आणि गुवाहाटीला आलेल्यांपैकी एकाला परत जायचे होते, त्याला शिंदे साहेबांनी सन्मानाने, दोन कार्यकर्ते सोबत देऊन, खासगी विमानाने सुखरूप परत पोहोचवले. पण नंतर त्याने एकनाथ शिंदेंचीच बदनामी केली. पण त्यामुळे काहीही फरक पडला नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी आम्ही हे सर्व काही केले आणि मायबाप जनतेने त्याचे स्वागत केले, याचा मनस्वी आनंद आहे. शेवटी हे सर्व करायचे कुणासाठी, तर मायबाप जनतेसाठीच ना, असे आमदार जयस्वाल आपला तो प्रवास उलगडताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in