Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘त्या’ घोषणेनंतर तिघांना डच्चू, आदित्य दुरूगकर यांना दिली बढती

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या आठवड्यात विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली.
Raj Thackeray appointed Aditya Durugkar.
Raj Thackeray appointed Aditya Durugkar.Sarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या आठवड्यात विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली आणि कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार काल मुंबईत झालेल्या बैठकीत जुन्यांपैकी तिघांना डच्चू देण्यात आला आहे.

विद्यार्थी सेनेचे विदर्भ (Vidarbha) प्रमुख आदित्य दुरुगकर (Aditya Durugkar) यांना नागपूर (Nagpur) ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे. नागपूर शहर अध्यक्ष म्हणून विशाल बडगे व चंदू लाडे यांना संधी देण्यात आली आहे़. जुने शहर अध्यक्ष अजय ढोके यांना डच्चू देण्यात आल्याची माहिती आहे़. चंदू लाडे यांच्याकडे पूर्वी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती़ आता त्यांना पश्चिम, दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपूर या तीन विधानसभा क्षेत्राकरिता शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

विशाल बडगे यांच्याकडे मध्य, दक्षिण व पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राकरिता शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे़. सध्या फक्त तीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली असून इतर पदाधिकाऱ्यांची नावे, शहर व ग्रामीणची संपूर्ण कार्यकारिणी लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मागील १६ वर्षांत नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षसंघटन पाहिजे त्या प्रमाणात बळकट का झाले नाही, असा सवाल उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ सप्टेंबरला नागपूरची कार्यकारिणी बरखास्त केली होती़ घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी घोषित होणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात केली होती़ यानुसार मुंबईत विविध जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे आज घोषित करण्यात आली़.

ग्रामीण जिल्हाप्रमुख व नागपूर शहराच्या दोन शहर प्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात ग्रामीणच्या दोन शहरातील एका जुन्या पदाधिकाऱ्याला डच्चू देण्यात आला आहे. १८ व १९ सप्टेंबर अशा दोन दिवसीय नागपूर दौऱ्यात राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला़ होता. यात अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही जुन्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना आपल्या भावना व विचार खुलून व्यक्त करता यावे म्हणून मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही बैठकीपासून दूर ठेवले होते.

Raj Thackeray appointed Aditya Durugkar.
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेने राज ठाकरे संतापले अन् मनसैनिकांची पीएफआय कार्यालयावर धडक..

कार्यकर्त्यांचे म्हणणे एकूण घेतल्यावर त्यांनी नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली़. घटस्थापनेला नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले होते. मनसेचे अनेक पदाधिकारीदेखील मुंबईत ठाण मांडून बसले होते, आज मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थी सेनेचे विदर्भ प्रमुख आदित्य दुरुगकर यांना संधी देण्यात आली आहे़ तर ग्रामीणमधून सतीश कोल्हे व किशोर सरायकर यांना डच्चू देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in