Rahul Gandhi यांच्या 'भारत जोडो' नंतर महाराष्ट्रात नानांचे ‘हात से हात जोडो’

Nana Patole : येत्या १० जानेवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपूरला आयोजित केलेली आहे.
Rahul Gandhi and Rahul Gandhi
Rahul Gandhi and Rahul GandhiSarkarnama

Maharashtra Congress News : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्‍ट्रातून गेली. या यात्रेला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याच ऋंखलेत आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "हात से हात जोडो" हा अडीच महिन्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, येत्या १० जानेवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपूरला (Nagpur) आयोजित केलेली आहे. ‘हात से हात जोडो’ हा उपक्रम आम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेनंतर सुरू केला आहे. दोन ते अडीच महिन्यांचा हा कार्यक्रम आम्ही आखला आहे. यामध्ये बूथ स्तरावरच्या माणसापर्यंत आमचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाणार आहे. गाव स्तरावर बैठका होणार आहेत. संघटनात्मक पातळीवर एक मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही आता उतरणार आहोत.

गावातल्या शेतकऱ्याला त्याचा धान गावातच मोजता आला पाहिजे, यासाठी आम्ही जी यंत्रणा तयार केली होती. ती उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. त्यामध्ये तपासून चौकशी करावी आणि कारवाई करावी, असे त्यामध्ये लिहिले होते. राजकीय दबावामुळे आपल्या जिल्ह्यातील १०५ केंद्र बंद करून टाकले. त्याचा परिणाम म्हणून आमची व्यवस्था कोलमडली. ज्या संस्थांनी चुका केल्या, चोऱ्या केल्या, काट्यामध्ये गडबड करून शेतकऱ्यांची लूट केली. त्या कोणत्याही संस्था असो, त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आम्ही मांडली, असे पटोले म्हणाले.

डीपीडीसीमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, त्यावेळी आम्ही सांगितले आणि विधानसभेतही ही बाब त्यांना सांगितले. पण हे सरकार दबावापोटी आणि शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरीही राजकीय द्वेषापोटी सरकार केंद्र बंड पाडत आहे. त्यानंतर आम्ही सांगितले की आता आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. त्यानंतर काल कुठे सरकारने बंद केलेले १०५ केंद्र सुरू केले. या दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय झाली, त्यांना त्रास झाला आणि या त्रासाचा बदला शेतकरी सरकारकडून घेणार, हे निश्‍चित आहे.

Rahul Gandhi and Rahul Gandhi
Patole on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची आम्हाला चिंता वाटते : नाना पटोले असं का म्हणाले?

भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाची वजनमाप विभागाकडून चौकशी झाली. त्यामध्ये दोन ते पाच किलोचा फरक येत होता. त्याला ५५ हजार रुपयांचा दंड वजनमाप विभागाने केला. जवळपास ४ कोटी रुपयांची लूट त्याने वजनात घोटाळा करून केली, अशी नोंद आहे. पण त्याच्या केंद्राला या सरकारने मान्यता दिली. एखादा शेतकऱ्यांना लुटत आले, पण तो भाजपचा आहे, म्हणून तुम्ही त्यांना मदत करणार का, असा प्रश्‍न मी विधानसभेत विचारला होता. असे चित्र यापूर्वी कधीही नव्हते, असे नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com