Bharat Jodo Yatra : सावरकरांवरील टीकेचं महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधींनी केलं समर्थन; म्हणाले...

Bharat Jodo Yatra | ज्यांना वेगळी भुमिका घ्यायची ते घेऊ शकतात. आपण एकमेकांच्या भुमिकेचा आदर करायला शिकायला पाहिजे.
Bharat Jodo Yatra |
Bharat Jodo Yatra |

Bharat Jodo Yatra बुलडाणा : ''सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते, त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हात मिळवले, त्यानंतरच संपूर्ण जीवन त्यांनी इंग्रजांशी वफादारी दाखवली. हे सांगण्यात काहीच चुक नाहीये आणि ते सांगायचं धाडस असायलाच पाहिजे, पण असं जर कोणी करत असेल तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट होतं. राहुल गांधींनी (Raul Gandhi) हे धाडस दाखवलं. ज्यांना सत्य माहिती आहे. त्यांनी सत्य लपवलं म्हणजे त्यांची सत्याशी निष्ठा नाही हे कळून येतं,'' अशा शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनी आपली भुमिका मांडली आहे.

तुषार गांधी आज भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधींसोबत पदयात्रेत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राहुल गांधी यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला आहे. 'राहुल गांधी यांचं वक्तव्य अगदी योग्य आहे. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी जे सत्य आहे ते सत्यच मांडलं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफीही मागितली होती. त्यांच्याकडून पेन्शनही घेतली होती. त्यात न सांगण्यासारखं काही नाही, सत्य सांगायला घाबरलो तर आपण सत्याशीही दगाबाजी करत आहोत.

पण याबाबत शिवसेना आणि मनसे वेगळी भुमिका घेतात, असं विचारलं असता तुषार गांधी म्हणाले, की, ज्यांना वेगळी भुमिका घ्यायची ते घेऊ शकतात. आपण एकमेकांच्या भुमिकेचा आदर करायला शिकायला पाहिजे. जाहीर जीवनात ही कमतरता आपल्याला दिसून येते. माझं मत वेगळं असू शकतं. माझ्या मताचा आदर करणं शिकलं पाहिजे. आम्ही कुठे म्हणतो की मनसे आणि भाजपने वेगळी भुमिका घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून हाकलून काढू, आम्ही त्यांना अंस काही सांगत नाही. जसा त्यांना आहे तसा आम्हालाही अधिकार आहे.

दरम्यान, देशाचे संविधान व लोकशाहीवर हुकुमशाही सरकार घाला घालत असले तरी आम्ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हातात हात घालून निघाले आहोत, असा संदेशच गांधी-नेहरू यांनी दिला. देशात जेव्हा इंग्रज सत्तेची हुकमशाही राजवट जुलुम व अत्याचार करत होती, तेव्हा जनतेचा आवाज बुलंद करत गांधी - नेहरू रस्त्यावर उतरले होते. स्वातंत्र्याच्या लढ्याचा जाज्वल्य इतिहास आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांनी पुन्हा अनुभवला. राहुल गांधी व तुषार गांधी भाजपाच्या हुकुमशाही राजवटीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करत आज रस्त्यावर उतरल्याचे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in