Mitkari On Ajit Pawar CM : " अजित पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं...!" ; पांडुरंगानंतर मिटकरींचं गणरायालाही साकडं

NCP Political News : '' अजितदादांवर टीका करणाऱ्याला अक्कल येऊ दे...''
Amol Mitkari -  Ajit Pawar
Amol Mitkari - Ajit Pawar Sarkarnama

जयेश गावंडे

Akola Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच त्यांनी अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन पुढील वर्षी आषाढी एकादशीची महापूजा करतील. अजितदादांना महापूजेचा मान मिळो. पुढील महापूजा अजित पवारांच्या हस्ते होवो, असं साकडं त्यांनी पांडुरंगासह तुकोबारायांच्या चरणी घातलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी मोठं विधान करताना गणेशाला साकडं घातलं आहे.

आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांच्या अकोल्यातील घरी मंगळवारी गणपतीची स्थापना करण्यात आली. यावर्षी त्यांनी खास शिवकालीन देखावा साकारला आहे. या वेळी त्यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, असं साकडंदेखील बाप्पाला घातलं आहे.

Amol Mitkari -  Ajit Pawar
Babajani Durani With Ajit Pawar: कोंडी होत असल्याने आमदार बाबाजानींनी शरद पवारांची साथ सोडली...

राज्यात आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. विविध राजकीय मंडळींनी आपल्या घरी गणपतीची स्थापना केली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरीदेखील बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं. या वेळी मिटकरी यांनी सहपरिवार गणपती बाप्पाची स्थापना केली.

आमदार अमोल मिटकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदारीचा विषय मांडण्यासाठी यावर्षी शिवकालीन गाव हा देखावा साकारला आहे. राज्यातील शेतकरी हा सुजलाम सुफलाम व्हावा, तसेच त्यासाठी अजित पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि अजितदादांवर टीका करणाऱ्याला अक्कल येऊ दे, असं साकडं मिटकरी यांनी बाप्पाला घातले.

मिटकरी यांनी आपल्या घरच्या गणपतीसाठी शिवकालीन देखाव्याची आरास मांडली. या वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेलं संकट गणरायांनी दूर करावं, असेही ते म्हणाले.

...अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी !

गोपीचंद पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी म्हणाले, स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा पलटवार त्यांनी केला होता.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)जी, मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो, तुमचा तो पालतू गोप्या हा त्याच्या लायकीपेक्षा जास्त भुंकतोय. आज तो त्याच्या लायकीबाहेर भुंकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपल्या जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही. सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही, देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी, वेसन घालावी असा इशाराही मिटकरींनी या वेळी दिला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Amol Mitkari -  Ajit Pawar
Praful Patel - Sharad Pawar Meet: राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या घडामोडी ? प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in