'हिंदू मुस्लिम लोकांमध्ये...'; नवनीत राणांनंतर आता रवी राणांची 'ती' ऑडियो क्लिप व्हायरल

Ravi Rana-Navneet Rana Audio clip news| जर तुम्ही हनुमानाचे सच्चे भक्त असाल तर हनुमान चालिसा म्हणूनच दाखवा.
'हिंदू मुस्लिम लोकांमध्ये...'; नवनीत राणांनंतर आता रवी राणांची 'ती' ऑडियो क्लिप व्हायरल
Ravi Rana-Navneet Rana Audio clip news|

Ravi Rana Audio clip news

अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. नवनीत राणांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

एका तरुणाने फोन करुन रवी राणांना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर पाच लाख लोक तुम्हाला लाईव्ह ऐकत आहेत, असं म्हणत हनुमान चालिसा बोलून दाखवण्याच चॅलेंज दिलं आहे. रवी राणा यांनी या तरुणाला तू कुठून बोलतोय, तुझं नाव काय, असा प्रश्न विचारला असता त्याने आपल नाव पारीस कादरी असल्याचं म्हटलं आहे. मी नागपूरमधून बोलत असल्याचं त्याने सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर महागाई, बेरोजगारी या विषयांवर बोलण्याऐवजी तुम्ही हनुमान चालिसावरुन का वाद घालत आहात, असा सवालही या तरुणाने रवी राणांना केला आहे.

Ravi Rana-Navneet Rana Audio clip news|
‘मातोश्रीच्या खजिनदारा’चा पापाचा घडा भरलाय : रवि राणांनी डागली तोफ

जर तुम्ही हनुमानाचे सच्चे भक्त असाल तर हनुमान चालिसा म्हणूनच दाखवा, असं ओपन चॅलेंज देत या तरुणाने राणांसोबत फोनवर वाद घातला. एकूण 8 मिनीटांची ही ऑडिओ क्लिप असून या ऑडिओ क्लिपचा शेवटचा भाग पूर्णपणे म्युट करण्यात आला आहे. मंदिर-मशिदचे विषय काढून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये भांडणे का लावता, असं म्हणत या तरुणानं रवी राणांना सुनावलं आहे. तर तुम्हीहनुमान चालीसेचाविरोध करता का? असा प्रतिप्रश्न विचारत रवी राणा आणि त्या तरुणामध्ये या कथित व्हायरल ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगमध्ये बाचाबाची झाल्याचं ऐकायला मिळत आहे.

गुढी पाडव्याच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशीदींवरील भोंग्यविरोधात हनुमान चालीसा चालवण्याची हाक दिल्यापासून राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरला आणि तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. या मुळे त्यांना तुरुंगाची वारीही करावी लागली. मात्र अद्यापही त्यांननी आपला हनुमान चालिसेचा लावून धरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in