फडणवीसांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्र्यांनी नागपूरसाठी घेतला ‘हा’ निर्णय...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हा प्रतिसाद दिला आहे. ही कारवाई तत्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
फडणवीसांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्र्यांनी नागपूरसाठी घेतला ‘हा’ निर्णय...
Devendra Fadnavis with Ashwin Vaishnav, Nagpur Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांच्या संदर्भात कुठलीही कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी केली. वैष्णव यांनी लगेच ती मान्य करून झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसीसंदर्भात कुठलीही कारवाई करू नये, असे निर्देश नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले. (Devendra Fadanvis News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हा प्रतिसाद दिला आहे. ही कारवाई तत्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात (Nagpur) 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलीकडे रेल्वेमंत्री मुंबईच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना अधिकृतपणे निवेदन देत या नागरिकांची व्यथा मांडली. यावेळी या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर रेल्वेमंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लगेच दूरध्वनी करून कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. (Nagpur Latest Marathi News)

सर्वांच्या कागदपत्रांची पुन्हा नीट पडताळणी करावी आणि तोवर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी सांगितले. रामबाग, इंदिरानगर, ताटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत. ही जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिल रोजी नागपुरात रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून केली होती.

Devendra Fadnavis with Ashwin Vaishnav, Nagpur Latest Marathi News
मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो!

या प्रश्नात आपण रेल्वेमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते आणि त्यानुसार रेल्वेमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यात याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. सुमारे 1600 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. या परिसरात 100 वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाईन टाकण्यात आली होती. गेल्या 75 वर्षांत त्या लाइनचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यानच्या काळात त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले, वीज मंडळाने वीज जोडणी दिली. तीन पिढ्यांपासून ती कुटुंब तेथे राहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in