Congress News: भारत जोडोनंतर कॉंग्रेसचे लक्ष्य ‘हाथ से हाथ जोडो’, सहभागी नसलेल्यांची पदे काढणार !

Vikas Thakre : शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली.
Vikas Thakre
Vikas ThakreSarkarnama

Nagpur City News : आगामी काळात नागपूर (Nagpur) महानगरपालिका (Municipal Corporation)आणि त्यानंतर इतर निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी कॉंग्रेसने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत काही पदाधिकारी गैरहजर होते, अशा पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेण्यात येतील, असा सज्जड दम आमदार ठाकरे यांनी दिला आहे.

यानंतरही काँग्रेसच्या (Congress) ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानात जे सहभागी होणार नाही त्यांना पद सोडावे लागेल, असा इशारा विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी दिला. हे अभियान राबविताना कुणीही गटबाजीचा विचारही मनात आणू नये. आता बूथ पातळीपर्यंत जाऊन काम करण्याची वेळ आलेली आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. जे अध्यक्ष काम प्रामाणिकपणे करणार नाही, त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात येतील, असेही आमदार (MLA) ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या मोठ्या यशातंतर काँग्रेस कमिटीने राष्ट्रीय पातळीवर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याचा ठराव केला. यासंदर्भात अलीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक नागपुरात घेण्यात आली. या अभियानाचे नियोजन करण्यासाठी विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर काँग्रेसची बैठक घेण्यात आली. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, पुरुषोत्तम हजारे उपस्थित होते.

आमदार ठाकरे म्हणाले, ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची सुरुवात ब्लॉक व प्रभागनिहाय करायची आहे. ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या क्षेत्रातील प्रमुख ज्येष्ठ नेते, आमदार, माजी खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सेलचे अध्यक्ष व समस्त पदाधिकाऱ्यांसह घरोघरी जायचे आहे. पदयात्रा, छोट्या बैठका घेऊन माहिती द्यायची आहे. ब्लॉक अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारच्या गटबाजीचा विचार न करता सर्वांना सहभागी करून घ्यावे.

Vikas Thakre
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

जे ब्लॉक अध्यक्ष अनुपस्थित राहिले त्यांच्या जागी नव्या नावांचा विचार करण्याचे ठरविले आहे. सेलच्या अध्यक्षांवर निरीक्षक नेमून त्यांच्या कार्याचा आढावा शहर कॉंग्रेस कमिटीकडून वारंवार घेण्यात येईल. सक्रिय नसलेल्या सेलच्या अध्यक्षस्थानी दुसऱ्याची नियुक्ती केली जाणार असल्याचे ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

मुत्तेमवारांनी टोचले कान..

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले, इतर पक्ष सत्तेत असताना कार्यक्रम राबवीत असतात. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी बदलायला तयार नाही, अशा शब्दांत त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in