औंढा नागनाथनंतर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मेडिकल कॉलेजला मुनगंटीवारांचे नाव…

त्यांच्या MLA Sudhir Munbantiwar राजकीय कार्यासोबतच सामाजिक कार्याची प्रचिती उत्तरप्रदेशातील UP सुलतानपूर येथील नागरिकांना अनुभवायला मिळाली.
औंढा नागनाथनंतर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मेडिकल कॉलेजला मुनगंटीवारांचे नाव…
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव औंढा नागनाथ येथील एका विद्यालयाला यापूर्वीच देण्यात आले होते. आता उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मेडिकल कॉंलेजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. माझे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून जनतेला अतिशय उत्कृष्टरीत्या सेवा मिळावी, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आमदार मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांना औंढा नागनाथ येथे सर्वच विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांची सामाजिक कार्याप्रति असलेली तळमळ बघून औंढा नागथवासी भारावून गेले. आज मुनगंटीवार मंत्री नाहीत, पण मंत्रिपदाच्या काळात केलेले कार्य औंढावासीयांच्या आजही स्मरणात आहे आणि त्यांनी उभारलेल्या शाळेला सुधीर मुनगंटीवार यांचे नाव दिले.

आमदार मुनगंटीवार यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यभर विविध कामे केली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच मुनगंटीवारसुद्धा काम करताना जात, धर्म, पंथ, पक्ष काही बघत नाही. विकासकामे येवढेच त्यांचे ध्येय असते. त्यामुळे त्यांच्या नावाचा डंका आता महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचला आहे. औंढा नागनाथ येथील विद्यालयाला त्यांचे नाव दिल्यानंतर आता देशाची धार्मिक राजधानी असलेल्या उत्तरप्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या राजकीय कार्यासोबतच सामाजिक कार्याची प्रचिती उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथील नागरिकांना अनुभवायला मिळाली.

MLA Sudhir Mungantiwar
कॉंग्रेस हटवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी दिला ‘हा’ कानमंत्र…

समाजकारणातून राजकारण करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. आपल्या कर्तव्यदक्ष कार्याच्या भरवशावर त्यांना जनतेचे मोठे प्रेम लाभले. तब्बल सहा वेळा विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. वनमंत्री असताना त्यांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक ठरली. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव द्यायचा विषय असो की पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव मिळवून देण्याचा. यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

दोन संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना सुधीर मुनगंटीवार यांचे नाव दिले आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील एक महाविद्यालय सुधीर मुनगंटीवार यांच्या नामाभिधानाने सुरू झाले आहे. तर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. माझे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून जनतेला सेवा अतिशय उत्कृष्टरीत्या मिळावी, असा आशावाद सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तरप्रदेशातील सुलतानपुरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in