विमानतळावर झाल्या १०० चाचण्या, त्यानंतर नागपूरने सोडला सुटकेचा निःश्‍वास...

अहवाल हाती येताच आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. कारण तपासणीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह (Negative Reports) आले. ओमायक्रॉनची (Omycron) बाधा नसल्याचे स्पष्ट झाले.
Nagpur Airport
Nagpur AirportSarkarnama

नागपूर : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा (Omycron) शिरकाव झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखी स्थिती उद्भवू नये, म्हणून आवश्‍यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. शारजातून नागपुरात (Nagpur Airport) आलेल्या १०० प्रवाशांची आरटी-पीसीआर (RTPCR) चाचणी विमानतळावर करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.

स्थळ...डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. रविवारी सकाळी पावणेसात वाजता शारजा-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उतरले. ओमायक्रॉनचे सावट घोंघावत असल्याने सारेच दहशतीत होते. सारे वातावरण चिंताग्रस्त होते. तणावाच्या वातावरणात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक करीत शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली. तब्बल दीड ते दोन तास नमुने घेतले. जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रवासी विमानतळावरच थांबले होते. मनात धास्ती... होती. अहवाल हाती येताच आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. कारण तपासणीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. ओमायक्रॉनची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले.

आप्तस्वकीयांना घेण्यासाठी नातेवाइकांनी विमानतळावर गर्दी केली होती. शारजा विमानातून आलेल्या प्रवाशांना विमानतळाच्या आतल्या परिसरात थांबवले होते. चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे साऱ्यांना सोडले. मात्र, प्रवाशांचे राहण्याचे ठिकाण, संपर्क मोबाईल नंबर आदींची माहिती घेण्यात आली. यानंतरच त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याची अट घालण्यात आली. तीन दिवसानंतर पुन्हा सर्व प्रवाशांना संपर्क करण्यात येणार आहे. पुढील चाचणीत कोविड तपासणीनंतर नियमाप्रमाणे उपचार सुरू करण्यात येतील. आठ दिवसानंतर पुन्हा सर्व १०० प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास आमदार निवासातील कोविड सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.

Nagpur Airport
धारावी ओमायक्रॉनच्या छायेत? टांझानिया रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह

९५ प्रवासी शारजाला रवाना..

ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट राज्यात आढळल्याने केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेच्या वतीने विमानतळावर आज चाचणीसाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. नागपूर ते शारजा प्रवास करणाऱ्या सर्व ९५ प्रवाशांना चाचणीनंतरच विमानात प्रवेश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानातील येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.

गृह विलगीकरणातील प्रवाशांवर पथकाची नजर..

शासनाच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. निगेटिव्ह अहवालानंतर प्रवाशांना गृहविलगीकरणात राहण्याची सूचना केली. त्यांच्यावर महापालिकेच्या पथकाची नजर असेल. हे पथक दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी संबंधित प्रवाशाच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल, मेयोत पाठवण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com