Devendra Fadnavis News : उकेंच्या याचिकेवरील पुढील सुनावणी फेब्रुवारीपर्यंत तहकूब

उके सध्या ईडीच्या (ED) प्रकरणात न्यायालईन कोठडीत आहेत.
Devendra Fadnavis, Satish Uke
Devendra Fadnavis, Satish UkeSarkarnama

Devendra Fadnavis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करणाऱ्या ॲड. सतीश उके यांच्या अर्जावर दिवाणी सहन्यायाधीश व न्याय दंडाधिकारी सुनावणी झाली.

ॲड. उके सध्या ईडीच्या खटल्यात मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. अशा स्थितीत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाला युक्तिवाद करण्याची विनंती केली होती. खटल्यातील सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सुनावणी फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

Devendra Fadnavis, Satish Uke
Jayant Patil : जयंत पाटील फडणवीसांना गिफ्ट देणार; पण 2024 मध्ये, काय आहे त्यांच्या मनात ?

फडणवीस यांच्यावर १९९६ आणि १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांनी न्यायालयातून जामीन घेतला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दावा अर्ज भरताना त्यांनी या दोन प्रकरणांची माहिती दिली नाही, असा आरोप उके यांनी केला होता.

Devendra Fadnavis, Satish Uke
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबे थोरातांचे टेन्शन आणखी वाढवणार...लवकरच भाजप प्रवेश?

उके यांनी या विषयावर जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in