Gadchiroli जिल्ह्यातील जाफराबादवर आदिवासी विकास संघटना व राष्ट्रवादीचा झेंडा...

Akola जिल्ह्याच्या २६६ पैकी अकोट तालुक्यातील धामणगाव ही एक ग्रामपंचायत अविरोध झाली आहे.
Amravati
AmravatiSarkarnama

Grampanchayat Election Results : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात ३०५ पैकी १३ ग्रामपंचायतींचे निकाल लागलेले आहेत. यामध्ये भाजप ५, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, कॉंग्रेस १, तर तीन ग्रामपंचायतीवर अपक्षांनी विजय मिळविला आहे. शिवसेनेने अद्याप खाते उघडलेले नाही. अकोला (Akola) जिल्ह्याच्या २६६ पैकी अकोट तालुक्यातील धामणगाव ही एक ग्रामपंचायत आधीच अविरोध झाली आहे. सरपंच आणि सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. बाकी २६५ ठिकाणची मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण निकाल लागण्यासाठी किमान ४ वाजेपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे.

बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील १० ग्रामपंचायतींची मतदानाची मतमोजणी आज सकाळी दहा वाजतापासून बुलढाणा तहसील कार्यालयात सुरू झाली. मतमोजणीसाठी ९ टेबलाची व्यवस्था करण्यात आली असून यावर २५ मतदान कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या जाफराबाद ग्रामपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने एकहाती सत्ता मिळविली आहे. येथे युतीचे सर्वच्या सर्व ११ सदस्य निवडून आले आहेत. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात दावसा, मायवाडी, जामगाव व आग्रा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. तर भाजपने आरंभी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. कामठी तालुक्यात खापा आणि गुमथी ग्रामपंचायतीवर भाजप समर्थीत उमेदवारांनी बाजी मारली आहे.

यवतमाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने खाते उघडले आहे. आतापर्यंत तीन जागांचे निकाल जाहीर झाले असून तिन्ही जागांवर भाजप प्रणीत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. उमरेड तालुक्यात कॉंग्रेसचे अरुण बालपांडे, सिर्सी वंदना भुटे, पिपळा प्रशांत पाहुणे हे ठाकरे गटाचे उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत. भंडारा जिल्ह्यात सोनेगाव भाजप प्रमिला कठाणे, तिरखुरी चंद्रशेखर खेडीकर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. आर्णी तालुक्यातील इवळेश्वर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Amravati
''...तरीही ग्रामपंचायत निकालात भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार!'' फडणवीसांचा आत्मविश्वास

अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोदोरी ग्रामपंचायतीवर लीना गजानन केणे या २६३ मते घेऊन विजयी झाल्या आहेत, तर बालिका दिगंबर दांडगे १४३ यांचा पराभव झाला आहे. सावनेरमध्ये अर्चना विनोद ठाकरे ६३६ विजयी, सरोज प्रमोद तायडे - ६०२ पराभूत, लोहगावमध्ये सीमा बाबाराव सानप - ७६४ विजयी, मंदा विनायक नागरगोजे - ३९५ पराभव. खिरसाणा विशाल मेश्राम - २७१ विजयी, निवृत्ती जगताप - २२६ पराभूत. माऊली चोर ग्रामपंचायतीवर संगीता अनिल झंजाट - ५७८ विजयी, तर ममता प्रदीप चोरे - ४०८ यांचा पराभव झाला. भातकुलीमध्ये ११ पैकी ७ जागी काँग्रेस समर्थीत उमेदवारांनी बाजी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com