Aditya Thackeray:आदित्य ठाकरेंनी नागपुरात सांगितले की, ‘खोके’वाले कशामुळे हादरले…

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे, असे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

नागपूर : मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय, पण जे गद्दार सरकार आलंय, ते दडपशाहीचं सरकार आहे. गद्दार हे खोके सरकार पुढे नेत आहे. खोके सरकारच्या मागे कोण होतं ते आता पुढे यायला लागलं आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे, असे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील मानगाव राखेच्या बंधाऱ्याने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले असता नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच (Shivsena) असतो, हे तमाम महाराष्‍ट्राला (Maharashtara) माहिती आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कुणी हायजॅक करू शकत नाही. या गद्दारांना निमित्त हवं असतं आणि त्याच्याच शोधात ते असतात. परवा सत्ताधारी पक्ष निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर होता. सत्ताधारी पक्षाला आपण कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बघितलं आहे का, असा प्रश्‍न आदित्य ठाकरे यांनी केला. खरं म्हणजे आमच्या शिव संवाद यात्रेला राज्यभर भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे खोके सरकार हादरलेले आहे. त्यामुळेच असले प्रकार करीत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय, पण आमचा अर्ज घेतला जात नाहीये. मुंबईत मनपात बदल्यांचं सरकार झालंय. पण फरक पडत नाही. त्यांनी परवानगी दिली नाही, तरीदेखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा तेथेच होत असतो आणि याहीवेळी होणार, असे आदित्य ठाकरे यांनी निक्षून सांगितले. हे खोके सरकार किती दिवस टिकेल, याचा नेम नाही, असेही ते म्हणाले.

Aditya Thackeray
Shivsena: अमाप उत्साह, नागरिकांच्या गर्दीने आदित्य ठाकरे भारावले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेबद्दल विचारले असता, मनसे सोडा, त्यावर मी आम्ही जास्त काही बोलत नाही, असे ते म्हणाले. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहीत आहे, तमाम जनतेला माहिती आहे. जनता आमच्यासोबत आहे, गद्दारांसोबत नाही, हे सांगताना किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. शिवसेनेनं कुठलीही भूमिका सोडली नाही, शिवसेनेची भूमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील, असेही ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in