आदित्य ठाकरे काल पश्‍चिम विदर्भात आले, अन् आज पूर्व विदर्भात पडले खिंडार !

शिंदे (Eknath Shinde) सेनेने आता पूर्व विदर्भात (Vidarbha) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या युवा सेनेला मोठे खिंडार पाडले आहे.
Aditya Thackeray, Shrikant Shinde and Eknath Shinde
Aditya Thackeray, Shrikant Shinde and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेची शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी विभागणी झाली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे त्या ४० आमदारांच्या विरोधात राज्यभर फिरून उद्धव सेना बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून त्यांना सातत्याने हादरे देण्यात येत आहेत.

शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदे (Eknath Shinde) सेनेने आता पूर्व विदर्भात (Vidarbha) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या युवा सेनेला मोठे खिंडार पाडले आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भातील नेते किरण पांडव यांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर (Nagpur) ग्रामीण, रामटेक, भंडारा, गडचिरोली, नागपूर शहर या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावले. यामध्ये सुनील यादव, अभिषेक गिरी, काजी जोगराणा, लखन यादव, राज तांडेकर, प्रफुल्ल सरवान, सोनाली वैद्य, नेहा भोकरे, कगेश राव, दिपक भारसाखरे, रोशन कळंबे, शुभम नवले, हर्षल शिंदे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

किरण पांडव यांनी फोडलेले युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती आहे. आजच त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचेही सांगितले जाते. यासंदर्भात शिंदे गटाचे विदर्भातील नेते किरण पांडव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आमचाच गट खरी शिवसेना असल्याचे शिंदे गटाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. संपूर्ण शिवसेनेवर दावा शिंदे गटाने दावा ठोकला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. असे असताना शिंदे गटाकडून आता युवा सेना टारगेट केली जात आहे.

Aditya Thackeray, Shrikant Shinde and Eknath Shinde
Shivsena : शिंदे गटावर तुटून पडणारे आदित्य ठाकरे फडणवीसांच्या बाबतीत मवाळ ?

उद्धव ठाकरे गटामध्ये युवा सेना आदित्य ठाकरे सांभाळत आहेत. शिंदे गटाकडून युवा सेनेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्याची मागणी होत आहे. आदित्य यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे यांना पद्धतशीरपणे समोर आणले जात आहे. भविष्यात युवा सेनेवरही शिंदे गट दावा ठोकणार, असे चित्र निर्माण झाले आहे. नव्हे तशी तयारी शिंदे गटाकडून चालवली जात आहे. त्यातच पूर्व विदर्भात युवा सेनेला मोठे खिंडार पाडल्याने भविष्यात युवा सेनासुद्धा शिंदे गटाने ताब्यात घेतल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in