Dharmaal Mehram : अमोल मिटकरी म्हणजे, केवळ राजकारणातील थिल्लरपणा...

ॲड. मेश्राम (Dharmaal Meshram) म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाषणापलीकडे कुठलेही काम अद्याप केलेले नाही. त्यांना सेवाभाव कळत नाही.
Dharmapal Mehram and Amol Mitkari
Dharmapal Mehram and Amol MitkariSarkarnama

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी म्हणजे राजकारणातील थिल्लरपणा आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून तर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. एकप्रकारे ते विमनस्क झाले आहेत आणि त्यापोटीच ते अक्षरशः बरळायला लागलेले आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आमदार मिटकरींवर तोफ डागली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये (Amravati) रक्ततुला केली. त्यावरून आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) त्यांना लक्ष्य केले होते. यासंदर्भात बोलताना ॲड. मेश्राम म्हणाले (Ad. Dharmapal Mehram) की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाषणापलीकडे कुठलेही काम अद्याप केलेले नाही. त्यांना सेवाभाव कळत नाही. रक्ततुला कार्यक्रमातून संकलित झालेले रक्त रुग्णांच्या कामी येईल, कुणाची जीव त्यातून वाचणार आहे, याचेसुद्धा भान त्यांना राहिले नाही आणि चक्क ते टिका करत सुटले.

अशा सामाजिक उपक्रमांतून लोककल्याणाची भावना असते, येवढी साधी गोष्ट त्यांना कळू नये, याचे आश्‍चर्य वाटते. भावविवश होऊन, आवेशात भाषणं करणं आणि लोकांना भ्रमित करणं आणि त्यातून आपल्या राजकारणाची पोळी शेकणं, येवढंच काम अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते करीत आहेत. राजकारणातून केवळ आपली खळगी भरणाऱ्या या नेत्यांना अशा सामाजिक उपक्रमांचे महत्व कळणार नाही, यामागील लोकभावना ते कधीच समजू शकणार नाहीत, अमोल मिटकरींचे वक्तव्य म्हणजे त्यांची वैफल्यग्रस्तता आहे, असेही धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Dharmapal Mehram and Amol Mitkari
Video: अमोल मिटकरी काय म्हणतात पहा..

काय म्हणाले होते मिटकरी ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठीच आमदार रवी राणा यांनी त्यांची रक्ततुला केली. कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्यांनी हा खटाटोप केला असावा. फडणवीसांना खूश केलं तर ते आपल्याला मंत्रिपद देतील, या लालसेपोटीच राणा दाम्पत्याचा हा अट्टहास सुरू आहे, अशी खोचक टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. काल अकोल्यात आयोजित एका दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंकेसह आदी पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी आधीच मारामाऱ्या सुरू आहेत. त्यातच कॅबिनेट मंत्रिपदासाठी रवी राणांकडून फडणवीसांची रक्ततुला करण्यात आली. आता भाजपच्या आमदारांमध्येही मंत्रिपदाची इच्छा वाढत चालली आहे. एवढी लॉबिंग चाललेली आहे तिकडं. अमरावतीत रवी राणांनी फडणवीसांची रक्ततुला घेण्यामागे त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा, असाच काहीसा उद्देश असावा, अशीही टीका आमदार मिटकरी यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in