नवनीत राणांवर कारवाई होणार? पोलिस आयुक्तांनी दिले स्पष्ट संकेत

Navneet Rana : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल.
Navneet Rana|
Navneet Rana|Sarkarnama

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आपला कॉल रेकॉर्ड केला गेला, यावरून पोलिसांशी हुज्जत घालून राडा केला होता. यानंतर अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल व्हाव्यात, यासाठी अनेक संघटनांनी आंदोलन केली. मात्र या घटनेला सहा दिवस उलटूनही नवनीत राणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत. यावर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

या संदर्भात अनेक निवेदन व तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आयुक्त आरती सिंग यांनी दिली आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आरती सिंग यांनी सांगितलं आहे. तसेच विधी अधिकारी यांच्याशी चर्चा करून, पुढची कारवाई करू, असंही अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं. यामुळे आता नवनीत राणांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राणा यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत.

Navneet Rana|
Buldhana news|आता महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी

खासदार नवनीत राणा यांनी १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. राणांनी फोन रेकॉर्डिंगवरूनही पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला, पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला होता. मात्र पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मुलगी सातारा येथे आढळून आली. राजा पेठ पोलिसांनी मुलीकडून जबाब नोंदवून घेत, तिला आई-वडिलांकडे सुपूर्द केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in