16 MLAs : अशी होऊ शकते १६ आमदारांवर कारवाई, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष !

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, राजकारण ही विचारांची लढाई आहे. अशा प्रकारे हल्ला करणे ही राज्याची संस्कृती नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नागपूर : केंद्राच्या दबावामुळे ज्या पद्धतीनं घटना घडत आहे, त्या म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी या पद्धतीनं चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि विरोधकांना मारण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती सर्वांनी जोपासावी, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, राजकारण ही विचारांची लढाई आहे. अशा प्रकारे हल्ला करणे ही राज्याची संस्कृती नाही. महाराष्ट्रात अशा प्रकारचं कृत्य कधी झालेलं नाही. अशा कृत्यांना आळा घालायला हवा. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) असल्याने विधानपरिषदेचं विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे (Congress) असावं, ही आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचं ठरल्यानंतर काँग्रेसमधून विरोधी पक्ष नेत्याचं नाव ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

दिवसाढवळ्या तलवारी काढून सेलिब्रेशन करणं महाराष्ट्राची संस्कृती नाही, मधल्या काळात हे प्रकार झाले होते. असे होऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, प्रसंगी कायदे कठोर करण्याचीही भूमिका घ्यायला हरकत नाही. पण तलवारी काढून, गोळीबार करून सेलिब्रेशन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. निवडणुका एकत्र लढवायच्या की नाही ते येत्या काळात एकत्र बसून ठरवू आणि त्यानुसारच निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जाईल.

Nana Patole
Mumbai : राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा : नाना पटोले

महाराष्ट्रासाठी राज्यपालांची भूमिका दुटप्पी आहे. राज्यात पूरपरिस्थिती भीषण आहे. मात्र सरकार स्वागत समारंभात व्यस्त आहे. दोन लोक कशाची कॅबिनेट घेतात, हेच कळत नाही. काहीही झाले तरी एकनाथ शिंदे गटाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शेड्युल १० प्रमाणे १६ आमदारांवर कारवाई होऊ शकते. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. आता आमच्या सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in