Accident : अपघात प्रवण स्थळ नव्हे, ‘आमदार हरीष पिंपळे ॲक्सीडेंट स्पॉट’; वंचित आक्रमक !

Officers : अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काहीच कारवाई झाली नाही.
Akola Vanchit Bahujan Aghadi
Akola Vanchit Bahujan AghadiSarkarnama

Akola District's Vanchit News : आमदाराच्या कामगिरीला कंटाळून चक्क रस्त्यावरील अपघात प्रवण स्थळाचे नामकरणच भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांच्या नावावर करण्यात आले. हा प्रकार बार्शीटाकळी तालुक्यातील आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासन व लोकप्रतिनिधीविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी ही अनोखी पोस्टरबाजी केली आहे. (This is a unique poster.)

बार्शीटाकळी-मंगरूळपीर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्टरी जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत. त्याठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सतत येथे अपघात होत असतात. त्याबाबतीत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काहीच कारवाई झाली नाही. मूर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरीष पिंपळे यांना काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी बार्शीटाकळी तालुक्याच्यावतीने दोन्ही अपघात स्थळांचे नामकरण ‘आमदार हरीष पिंपळे ॲक्सीडेंट स्पॉट’ असे फोटोसहित बॅनर लावत करून निषेध नोंदवला. फ्लेक्सवर ‘१५ वर्ष आमदार कामगिरी एकदमच सुमार’, अशी घोषवाक्ये टाकून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी,तालुका संघटक हरीश रामचवरे, रोशन चोटमल, गणेश कवळकर, रक्षक जाधव, सनी धुरंदर, ऋषिकेश खंडारे, भूषण सरकटे, अमोल वकील जामनिक, रत्नपाल डोंगरे, रोशन इंगळे, शैलेश शिरसाट, प्रवीण वानखडे उपस्थित होते.

Akola Vanchit Bahujan Aghadi
Akola : पाणी आरक्षण, पूल अन् राजकीय ट्रँगल, भाजप, वंचित, शिवसेनेत रंगले वाकयुद्ध !

वंचितची लोकप्रतिनिधींविरोधात आघाडी..

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) गेल्या काही दिवसांपासून अकोला (Akola) जिल्ह्यात नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत लोकप्रतिनिधींच्या विरोधात आघाडीच उघडली आहे. जनतेची कामे प्रलंबित राहत असल्याने आंदोलनांच्या माध्यमातून पोलखोल करण्याचा प्रकार या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांकडून होत आहे.

यापूर्वी वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील नादुरुस्त पुलावरून आंदोलन केले होते. या आंदोलनाला ‘पोलखोल’ असे नावही देण्यात आले होते. आता मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे (BJP) आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात वंचितने आघाडी उघडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com