`आप` महाराष्ट्रात पाय रोवणार : केजरीवालांची अपक्ष आमदाराला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर

महाराष्ट्रातील एका माजी राज्यसभा सदस्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेल्या आठवड्यात येऊन गेले.
`आप` महाराष्ट्रात पाय रोवणार : केजरीवालांची  अपक्ष आमदाराला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर
Arvind Kejriwal Latest News, AAP entry in maharashtraSarkarnama

नागपूर : आम आदमी पक्षाने (AAP) दिल्लीवर आपली पकड जमवल्यानंतर पंजाबमध्ये विजयी पताका फडकावली. त्यानंतर आता महाराष्ट्राकडे कूच केली आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील एका अपक्ष आमदाराला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर येथीलच एका माजी राज्यसभा सदस्याच्या माध्यमातून दिल्याची पक्की माहिती ‘सरकारनामा’ला प्राप्त झाली. (AAP entry in Maharashtra)

महाराष्ट्रातील (Maharashtra) एका माजी राज्यसभा सदस्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) गेल्या आठवड्यात येऊन गेले. त्यामागे आम आदमी पक्षाला (आप) महाराष्ट्रात लॉंच करायचे आणि आपला राज्यसभा सदस्याचा मार्ग प्रशस्त करायचा, असा त्यांचा उद्देश असल्याचे सूत्र सांगतात. दिल्ली आणि पंजाबनंतर महाराष्ट्रात पक्षविस्तार करायचा, असा निर्णय अरविंद केजरीवालांनी घेतला असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात पाय रोवायचे म्हणजे राज्यभर मोठे नेटवर्क असलेला बडा नेता सोबतीला असणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील माजी राज्यसभा सदस्याला आपल्या कोट्यातून खासदार बनवायचे आणि मग येथे विस्तार करायचा. त्यातही हा नेता विदर्भातील बडे प्रस्थ आहे. उद्योगपती असून राजकारणाचा मोठा वारसा लाभलेला आणि दीर्घ अनुभवसुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या नेत्यानेच मग पूर्व विदर्भातील एका अपक्ष आमदाराला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. पण त्या आमदाराने अद्याप होकार दिला नसला तरी येवढ्यात त्यांची एक बैठक होऊ घातली असल्याचेही सूत्र सांगतात.

दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठे यश मिळविल्यानंतरही ‘आप’ला महाराष्ट्रात विस्तार करता आला नाही. परंतु येथील ‘त्या’ बलाढ्य माजी खासदारांना राज्यसभेत पाठविल्यानंतर महाराष्ट्रात ‘आप’ची अधिक चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते, असा विश्‍वास ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आहे. गेल्या रविवारी केजरीवाल, भगवंत मान आणि त्या नेत्याची याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यानंतरही उभय नेत्यांमध्ये ‘आप’च्या लॉंचिंगबद्दल चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याचेही सूत्र सांगतात.

Arvind Kejriwal Latest News, AAP entry in maharashtra
भाजपा का एक ही काल केजरीवाल, म्हणत ‘आप’चे पुण्यात आंदोलन

दिल्लीमध्ये ‘आप’ स्थिरसावर झाली आणि त्यानंतर पंजाबही काबीज केला. सर्वसामान्य जनतेची नाडी ओळखून काम करणारा नेता म्हणून केजरीवालांची प्रतिमा आहे. लोकांच्या सामान्य गरजा पूर्ण करून त्यांनी ‘आम आदमी’मध्ये विश्‍वास निर्माण केला आहे. महाराष्ट्रातही त्यांना हा प्रयोग करायचा आहे. येणाऱ्या दोन-अडीच वर्षांत ‘आप’चा विस्तार किती आणि कसा होतो, यावर सर्व निर्भर आहे. पण ज्या बलाढ्य नेत्याच्या संपर्कात केजरीवाल आहेत, त्यांचे नेटवर्क राज्यभर मोठे असल्यामुळे ‘आप’महाराष्‍ट्रात विस्तारणार का आणि २०२४ मध्ये एक प्रभावी पर्याय महाराष्ट्राला देणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.