आमदार सुनील केदारांनी प्रशंसा केलेले आधार केंद्र बंद, जिल्हाधिकारी कार्यालयात मुरतंय पाणी !

नगरपरिषद लोकसेवा केंद्र इमारतीतील आधार सेवा केंद्राचे उद्घाटन २०१५ मध्ये तत्कालीन आमदार सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांनी केले होते.
Adhar Center Inaugurated by MLA Sunil Kedar
Adhar Center Inaugurated by MLA Sunil Kedar Sarkarnama

नागपूर : नगर परिषद मोहपा व नगर परिषद कळमेश्वर येथील आधार सेवा केंद्र अनुक्रमे गेल्या पाच व तीन महिन्यापासून बंद असल्याने सामान्य नागरिकांची मोठी फरफट होत आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) भेटून कैफियत मांडुनही दोन्ही आधार केंद्र सुरू न केल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

आजची गरज असलेली आधार केंद्रे बंद असल्याने नागरिकांना अधिकचा प्रवास आणि खर्च करून गरजा भागवाव्या लागत आहेत. नगरपरिषद लोकसेवा केंद्र इमारतीतील आधार सेवा केंद्राचे उद्घाटन २०१५ मध्ये तत्कालीन आमदार सुनील केदार (MlA Sunil Kedar) यांनी केले होते. अल्पावधीतच या केंद्रातून लक्षणीय काम झाले. तालुक्यातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने ‘आधार’ ठरलेल्या केंद्राची आमदार सुनील केदार यांनी प्रशंसा केली होती. परिसरातील पन्नासपेक्षा अधिक गावांतील हजारो नागरिक विद्यार्थी या आधार सेवा केंद्राचा लाभ घेत होते.

कालांतराने दोन्ही आधार केंद्र महाऑनलाईन कंपनीतून महाआयटी कंपनीमध्ये मायग्रेट करण्यासाठी बंद करण्यात आले होते, जे लगेच सात दिवसांत सुरू व्हायला पाहिजे होते. परंतु महा आयटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण नसताना दोन्ही आधार केंद्र खोडसाळपणे व सूडबुद्धीने बंद करून ठेवलेली आहेत, ज्याचा मोठा त्रास नागरिकांना गेल्या सहा महिन्यांपासून होतो आहे.

विनाकारण बंद करून ठेवलेल्या या दोन्ही आधार केंद्रांबाबत कळमेश्‍वर तहसीलदार व सावनेरचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल तसेच त्यांच्या न्यायिक चारित्र्याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या गैरसोयीबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नगर भवन नगर परिषद कळमेश्वर व नगरपरिषद लोकसेवा केंद्र इमारत मोहपा येथील आधार सेवा केंद्र तात्काळ सुरू न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री इमेश्वर यावलकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Adhar Center Inaugurated by MLA Sunil Kedar
सुनील केदार म्हणाले, जे राज्यात होऊ शकले नाही, ते नागपुरात घडले...

जिल्हाधिकारी कार्यालयात मुरतंय पाणी..

खेड्यापाड्यांतील नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता ही केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी केंद्राच्या संचालकांनी तहसील कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे (Collector Office) उंबरठे झिजवले. पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील काहींनी दोन्ही केंद्रांची परवानगी रोखून ठेवली असल्याचा आरोप केंद्रांचे संचालक महेंद्र शेंडे यांनी केला आहे. आता आंदोलन झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाची असेल, असेही इमेश्‍वर यावलकर यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाला महाआयटीचे ग्रहण..

महाआयटीच्या अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण घोळ घातला असल्याचेही महेंद्र शेंडे यांनी आरोपात म्हटले आहे. या अधिकाऱ्यांचे काम केवळ मायग्रेशन करण्यापूरते मर्यादित आहे. पण ही मंडळी जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि संबंधितांची दिशाभूल करतात. त्यामुळे अशी आधार केंद्र विनाकारण बंद ठेवली जातात. त्याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. त्यामुळे महाआयटीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र शेंडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com