बच्चूभाऊंचा पारा चढला अन् 'शांत बस' म्हणत लगावली कानशिलात...

Bacchu Kadu : रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि कडू यांनी त्या व्यक्तीला बोलणं बंद करायला सांगितलं...
Bacchu Kadu Latest News
Bacchu Kadu Latest NewsSarkarnama

Bacchu Kadu : नुकतेच काही दिवसांपूर्वी जुन्या मारहाणीच्या प्रकरणात जामीनावर सुटलेले प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा वादात सापडले आहेत. बच्चू कडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडीयातच (Social Media) व्हायरल झाला असून ते यामध्ये एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आमदार कडू हे अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावात उद्घाटनासाठी गेले असता यावेळी रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि कडू यांनी त्या व्यक्तीला बोलणं बंद करायला सांगितलं. मात्र, संबंधित व्यक्तीने बोलणं सुरूच ठेवल्याने कडू यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे कडूंचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. (Bacchu Kadu Latest News)

Bacchu Kadu Latest News
जयंत पाटलांचेही पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट ,भाजप आमदार लांडगेंचं केलं सांत्वन...

२०१८ मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांना नुकताच जामीन मिळाला आहे. आता पुन्हा आमदार कडू हे यांच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमरावतील जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून कडू एका व्यक्तीच्या कानशिलात मारत असतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्याप्रणाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रस्त्याच्या कामावरून तिथे वाद झाल्याचे सांगितले जात असून व्हिडीओमध्ये बच्चू कडू यांच्यासमोर दोन व्यक्ती बोलत आहे. त्यातल्या एका व्यक्तीला बच्चू कडू ऐकून घे आधी, शांत बस असं म्हणत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं बोलणं सुरूच होतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे.

Bacchu Kadu Latest News
दौंड राष्ट्रवादीतील धूसफुस चव्हाट्यावर; रमेश थोरातांच्या समोरच आरोप-प्रत्यारोप...

कडू यांनी ज्या व्यक्तीच्या कानशिलात मारली. ती व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोलले जात होते. मात्र, सदर व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता नसून, तो स्थानिक नागरिक असल्याचही सांगितलं जात आहे.

दरम्यान, बच्चू कडूंनी एखाद्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. 2018 मध्ये त्यांनी मंत्रालयामध्ये राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक पी. प्रदीप यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आमदार कडूंनी त्यांच्यावर टेबलावरील लॅपटॉप उगारला होता. या प्रकरणी गेल्या त्यांना नुकताच जामीन मिळाला आहे. तसेच, कोरोना काळात देखील कडूंनी रुग्णालयातील स्वयंपाक बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. आता या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अद्याप काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in