रामटेकचा गड अभेद ठेवण्यासाठी 'मातोश्री'वर 'मोर्चेबांधणी'

Shivsena : माजी खासदार प्रकाश जाधव 'ऍक्टिव्ह'
Shivsena ,Bhaskar Jadhav Latest News
Shivsena ,Bhaskar Jadhav Latest NewsSarkarnama

हिंगणा : शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने व आमदार आशीष जयस्वाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या क्षेत्रावरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

रामटेक लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मातोश्री मुंबई येथे पार पडली. या बैठकीत खासदार व आमदारांना चक्रव्यूहात अडकविण्यासाठी मोर्चे बांधणी करण्यात आल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. तसा कानमंत्रही शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

एकेकाळी रामटेक लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता. 'लडकी नही लकडी भी यहा काँग्रेस की तरफ से इलेक्शन मे खडी की तो चुन के आयेगी', असे जुने काँग्रेस पदाधिकारी म्हणत होते. सन १९९५ ला भाजप सेनेची युती झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राची उमेदवारी वडील माजी मंत्री बाबासाहेब केदार यांच्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. (Shivsena ,Bhaskar Jadhav Latest News)

Shivsena ,Bhaskar Jadhav Latest News
Amol Mitkari : महाजनांकडून मिटकरींचा करेक्ट कार्यक्रम, गावातच बसला धक्का!

या मागणीनुसार युतीचे शिल्पकार माजी मंत्री प्रमोद महाजन यांनी रामटेक लोकसभा काँग्रेसला दिली. यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी बाबासाहेब केदार लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी भूमिका मांडली. शेवटी शिवसेनेने अशोक गुजर यांना उमेदवारी दिली. यावेळी शिवसेनेचा पराभव झाला. काँग्रेसच्या चित्रलेखा देवी भोसले या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून सुबोध मोहिते निवडून आले.

पोट निवडणुकीत प्रकाश जाधव यांची खासदारपदी वर्णी लागली होती. यानंतर शिवसेनेकडून कृपाल तुमाने यांची खासदार म्हणून दोन वेळा वर्णी लागली. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाने भाजपशी हात मिळवणी करून राज्यातील सत्ता बळकावली. शिंदेच्या गटात खासदार कृपाल तुमाने व आमदार आशीष जयस्वाल सहभागी झाले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षाची निर्मिती झाली. शिंदे गट वाढविण्यासाठी खासदार तुमाने व आमदार जयस्वाल यांनी हालचाली सुरू केल्या आहे.

Shivsena ,Bhaskar Jadhav Latest News
शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना आले 'अच्छे दिन'

ठाकरे गटाने याची तातडीने दखल घेतली. १० नोव्हेंबरला मुंबई येथील मातोश्रीवर रामटेक लोकसभा आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मातोश्रीवर पार पडलेल्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार मृणाल गोरे, शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील माजी खासदार प्रकाश जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख राजु हरणे, जिल्हा महिला संघटिका रचना कनेर, महिला पदाधिकारी वंदना लोणकर अंजुषा बोधनकर, हिंगणा शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश कनेर, अशोक झिंगरे, जीवतोडे गुरुजी, रवी जोडांगळे, प्रदीप गोतमारे, हिम्मत नखाते, समीर सोनारे, नरेंद्र मोरे, प्रेम रोडेकर, प्रशांत मानकर, युवा सेनेचे हर्षल काकडे उपस्थित होते.

रामटेक लोकसभा क्षेत्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे यांनी दिली. शिवसेनेचा गड असलेला रामटेक लोकसभा क्षेत्र व विधानसभा क्षेत्रात शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार लाखो आहेत. या मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत आपली बाजू भक्कमपणे मांडावी. खासदार कृपाल तुमाने व आमदार जयस्वाल यांनी ठाकरे गटाकडे पाठ फिरवून मोठी चूक केली आहे.

यामुळे मतदारच त्यांना आपली जागा भविष्यात दाखवून देतील. शिवसेनेकडे ज्यांनी पाठ फिरवली ते रामटेक लोकसभा क्षेत्रातून नामशेष झालेत. अशीच परिस्थिती या क्षेत्रात भविष्यात दिसून येईल. यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाशी दोन हात करण्यास सज्ज राहावे, असा कानमंत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. हा कानमंत्र घेऊन जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी परतले आहेत. आता शिंदे गटासोबत 'सामना' करण्यासाठी ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील काळात काय रणनीती आखतात? हे दिसून येईल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com