Bhandara: पोलीस गार्ड रुममधून शिपायाने चोरले रिव्हॉल्व्हर व 35 काडतूस, म्हणे कर्जबाजारी होतो!

निलेश खडसे (राहणार) गणेशपूर, असे अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. नीलेश हा भंडारा (Bhandara) जिल्हा व सत्र न्यायालयात (Court) मुद्देमाल व हिफाजत कक्षात तैनातीवर होता.
Bhandara Police
Bhandara PoliceSarkarnama

भंडारा : कर्जबाजारीपणातून वैतागून एका पोलिस (Police) शिपायाने सावकाराला धाक दाखविण्यासाठी भंडारा न्यायालयाच्या पोलीस गार्ड रुममधून पोलीस शिपायाने चक्क रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी पोलिस शिपायास अटक करण्यात आली आहे.

निलेश खडसे (राहणार) गणेशपूर, असे अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. नीलेश हा भंडारा (Bhandara) जिल्हा व सत्र न्यायालयात (Court) मुद्देमाल व हिफाजत कक्षात तैनातीवर होता. घटनेच्या दिवशी आरोपी निलेशची ड्यूटी नसताना तो गार्ड रुममध्ये बॅग घेऊन आला व ५ मिनिट थांबून शस्त्रांची तपासणी करून बॅगसह निघून गेला. दरम्यान सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली ०.३८ शासकीय रिव्हॉल्व्हर आणि ९ एमएमचे ३५ काडतूस शनिवारी चोरून घेऊन गेला.

सहायक फौजदार सुनील सायम यांना रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती समोर आल्याने भंडारा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षकांसह पोलिस अधिकारी तपासात लागले. घटनेनंतर सीसीटीवी फुटेज तपासल्यावर पोलीस नाईक निलेशवर संशय बळावला. त्यानंतर त्याला लगेच ताब्यात घेऊन उलट सुलट प्रश्नाच्या भडिमार त्याच्यावर केला.

Bhandara Police
भंडारा अत्याचार प्रकरणाला नवे वळण; दोन पोलिस अधिकारी निलंबित

अखेर आपल्यावर असलेल्या कर्जातून आपण हे कृत्य कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखविण्यासाठी केल्याचे निलेश ने कबूल केले. विशेष म्हणजे रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूस त्याने जिल्हा न्यायालयाच्या समोर सिव्हिल लाइन परिसरात ठेवली होती. अखेर पोलिस नाईक निलेश खडसे वर भादंवी कलम ३८० नुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्वर व ३५ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. विशेष म्हणजे केवळ धाक दाखविण्यासाठी रिव्हॉल्व्हर चोरण्यापर्यंत मजल पोलिसांची गेल्याने भंडारा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in