Amaravti Politics : राणा दांपत्याला पुन्हा अटक होणार?

Amaravti news| Navneet Rana| Ravi Rana| राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत.
Navneet Rana| Ravi Rana|
Navneet Rana| Ravi Rana|

अमरावती: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हनुमान चालिसाप्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. मात्र ते न्यायालयीन प्रक्रियेत कोणतेही सहकार्य करत नसल्याने राणा दाम्पत्यच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात यावं अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी विशेष न्यायालयात केली आहे. (Amaravti Latest Political news)

राज्यात सत्ता बदल झाल्यापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा दावा सरकारी पक्षाने केला आहे. तसेच, या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी ही करण्यात आली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना या प्रकरणावर राणा दाप्मपत्याने कोणतेही भाष्य न करण्याची अट घातली होती. परंतू राणा दाम्पत्याने त्या अटीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

Navneet Rana| Ravi Rana|
धनुष्यबाण सेनेकडेच राहिला तर शिंदे गट काय करणार?

राणा दाम्पत्याच्या वतीने गुरुवारी (४ ऑगस्ट) या अर्जावर युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु ते दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे कोणतेही वकील न्यायालयात उपस्थित राहिले नाही. त्यामुळे या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. इतकेच नव्हे तर दोघे एकदाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. त्यांच्याविरोधात आता कोणीच काही करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे, असा आरोपही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

गेल्यावेळी झालेल्या सुनावणीलाही राणा दाम्पत्य उपस्थित नसल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे राणा दाम्पत्याला न्यायालयाचाही आदर राहिला नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे सांगून राणा दाम्पत्याच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com