‘मैं झुकेंगा नही!’ : रवि राणांच्या माघारीनंतरही बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक

काल आमची बैठक झाली. आज जिल्हाध्यक्षांची बैठक होत आहे. त्यानंतर सर्वांच्या सह्या घेऊन एक दिव्यांग बांधव माझी भूमिका जाहीर करणार आहे.
Bachu Kadu
Bachu KaduSarkarnama

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी आपले शब्द मागे घेतले आहेत. मात्र, माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. मेळावाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘मै झुकेंगा नही’ असे पोस्टर्स लावून एक प्रकारे माघार घेणार नसल्याची भूमिका अत्यप्रत्यक्ष सूचित केल्याचे मानले जात आहे. (A Divyang will announce the role of Bacchu Kadu)

यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले की, काल आमची बैठक झाली. आज जिल्हाध्यक्षांची बैठक होत आहे. त्यानंतर सर्वांच्या सह्या घेऊन एक दिव्यांग बांधव माझी भूमिका जाहीर करणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी जी काही तयारी करण्यात आली आहे, ती कार्यकर्त्यांनीच केली आहे, ती त्यांची भूमिका आहे. त्या सर्वांच्या भावना आहेत. सर्वसामान्यांसाठी आमचा लढा आहे, त्यामुळे कोणासमोर झुकण्याचा प्रश्न येत नाही.

Bachu Kadu
मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारलेला शिक्षणाधिकारी दुसऱ्याच दिवशी लाच घेताना पकडला

आमदार बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी पन्नास खोक्याच्या संदर्भाने आरोप केला हेाता. त्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यात पुरावे द्यावे अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला होता. शेवटी या वादात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती.

Bachu Kadu
आमदार योगेश कदमांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; कोकणातून संधी मिळणार?

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर आमदार रवि राणा यांनी आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याच पद्धतीने आमदार बच्चू कडू यांनीही आपले शब्द परत घ्यावेत, असे आवाहन केले होते. त्यावर बच्चू कडू यांनी आज अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला आहे. त्यात ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

Bachu Kadu
राज्यातील आंधळे, मुके, बहिरे सरकार बरखास्त करा : काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

मेळाव्याच्या ठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी पुष्पा चित्रपटातील ‘मैं झुकेंगा नही’ या डॉयलॉगचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे माघार घ्यायची नाही, असे संदेश यातून दिला जात असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in