रस्त्याच्या कामात अपहार केल्याचा ठपका ठेवून बच्चू कडुंच्या विरोधात गुन्हा दाखल...

कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे देण्यात आली होती.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अकोला : रस्त्यांच्या कामातील अपहारप्रकरणी राज्यमंत्री तथा अकोला (Akola) जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध आज सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे (Vanchit Bahujan Aghadi) देण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने काल मंगळवारी कारवाईचा आदेश दिला होता.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जिल्हा परिषदेकडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला होता. मात्र जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला.

शासनाच्या एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याप्रकरणी ता. ३ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हे दाखल न केल्याने वंचिततर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (तीन) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने मंगळवारी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

Bacchu Kadu
Video: एक पैसाही खाल्ला असेल, तर हात कलम करून देईन; बच्चू कडू

राज्यमंत्र्यांवरील गुन्हे अजामीनपात्र..

- भादंविचे कलम ४०५ : फौजदारीपात्र न्यासभंग

- भादंविचे कलम ४०९ : लोकसेवकाने फसवणूक करणे

- भादंविचे कलम ४२० : फसवणूक करणे

- भादंविचे कलम ४६८ : खोटा दस्तावेज तयार करणे

- भादंविचे कलम ४७१ : खोट्या दस्तावेजाचा वापर करणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com