Ranjeet Patil News : भाजप उमेदवार रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल

रणजीत पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत.
Ranjeet Patil News
Ranjeet Patil News

Ranjeet Patil News : आचारसहिता भंग केल्याने भाजप आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असतानाही त्यांनी काल अमरावतीच्या महेश भवनात मेळावा आयोजित केल्याने त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने केला होता मेळावा आयोजित केला होता. मात्र तो मेळावा नसुन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंची शोकसभा असल्याचं स्पष्टीकरण रणजीत पाटील यांनी दिलं होतं.

दरम्यान, आज सकाळी त्यांनी त्यांच्या पत्नीसह डॉ. अपर्णा पाटील यांच्यासोबत मतदाना चा हक्क बजावला. अकोला शहरातील आर. डी. जी कॉलेजमध्ये मतदान केले. या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी होण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरावती पदवीधरमध्ये डॉ. रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे. यासाठी अमरावती विभागात 262 मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत.

Ranjeet Patil News
Bageshwar Baba News : बागेश्वर बाबांनी उधळली मुक्ताफळे; संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं..

रणजीत पाटील (Ranjit Patil) हे गेल्या बारा वर्षांपासून अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रिपद (Minister of State) सुद्धा भूषवले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. न्यायालयातही कुठलेही प्रकरण नव्हते. स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून त्यांची त्यांची ओळख आहे. आज होणाऱ्या ३० जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत त्यांची थेट लढत होणार असल्याची स्थिती सध्या तरी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com