सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर आमदाराने बांधली संघटनांची मोट...

डाॅ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीआमदार ॲड. अभिजित वंजारी (Abhijeet Wanjari) होते.
Abhijeet Wanjari
Abhijeet WanjariSarkarnama

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील सिनेट निवडणुकांसाठी पदवीधर आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी संघटनांची मोट बांधली आहे. त्यातूनच यावर्षी होणाऱ्या सिनेट निवडणुकांमध्ये यंग टिचर्स, सेक्युलर आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद एकत्रितपणे लढणार आहेत.

कमला नेहरू महाविद्यालयात काल रविवारी आयोजित कार्यक्रमात यंग टिचर्सचे सर्वेसर्वा डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी, (Abhijeet Wanjari) सेक्युलर पॅनलचे संयोजक डॉ. डी. के. अग्रवाल, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. के.सी. देशमुख, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी, डॉ. प्रदीप घोरपडे उपस्थितीत होते.

नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीच्या तयारीकरिता आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या तयारीकरिता यंग टीचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनल, विद्यार्थी संग्राम परिषद व विद्यापीठ कर्मचारी संघटना या सर्व संघटनांच्या प्रमुख २०० कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी बैठकीत सर्व संघटना एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या धर्तीवर नागपूर व गोंडवाना विद्यापीठाची सिनेटची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली. विद्यापीठात गेल्या ४० वर्षांपासून या प्रमुख संघटना कार्यरत असून आजपर्यंत शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांचे, प्राचार्यांचे, व्यवस्थापनांचे, कर्मचाऱ्यांचे आणी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न सोडविले गेले व ही परंपरा कायम ठेवत या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन निवडणुका लढविण्याचा निर्धार केला. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.

Abhijeet Wanjari
Video: संविधानाच्या कलम २४३ डी-६, २४३ सी-६ मध्ये सुधारणा करावी !; बबनराव तायवाडे

सध्या शिक्षकांमध्ये विद्यापीठ शिक्षण मंच, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना आणि यंग टिचर्सचा दबदबा आहे. याशिवाय पदवीधर प्रवर्गात अभाविप आणि व्यवस्थापन व प्राचार्य प्रवर्गात यंग टिचर्स आणि सेक्युलर पॅनलचा दबदबा आहे. यावेळी बैठकीला डॉ. भरत मेघे, डॉ. शरयू तायवाडे, डॉ. स्मिता वंजारी, डॉ. प्रिया वंजारी, जयंत पोटदुखे, डॉ. धनश्री बोरीकर, डॉ. राहुल खराबे, डॉ. किरण नेरकर, डॉ. विनोद गावंडे, डॉ. चेतन मसराम, डॉ. रामकृष्ण टाले, डॉ. राजीव जाधव, डॉ. धर्मेंद्र मुंदडा, डॉ दिलीप बडवाईक व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com