Eknath Shinde News : आमदार गायकवाडांनी केला करेक्ट कार्यक्रम; शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का

MLA Sanjay Gaikwad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा इतर पक्षांकडे वळवला आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Buldana News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा इतर पक्षांकडे वळवला आहे. विविध पक्षातील नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता शिंदे गटाने बुलडाण्यात काँग्रेसला (Cpngress) चांगलाचा धक्का दिला आहे.

बुलडाण्यात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी शिंदे गटात (बाळासाहेबांच्या शिवसेनेत) प्रवेश केला. या 8 नगरसेवकांचा जाहीर सत्कार शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या हस्ते करण्यात आला. मोताळा आठवडी बाजार येथील मैदानावर जाहीर सभेत काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Eknath Shinde News
Solapur News : सोलापुरात 'पॉलिटिकल वॉर' : राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपली!

त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे निवडून आले आहेत. त्याचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला आज मोठा धक्का बसला. कारण जिल्ह्यातीलच मोताळा येथील नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

Eknath Shinde News
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंची सात महिन्यातच जाहीरातींवर कोट्यावधींची उधळपट्टी; आकडा समोर

आमदार गायकवाड यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. नगरपंचायतमध्ये लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता स्थापन करून आपण शहराच्या विकासाला चालना देऊ, असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com