Congress : ७०० कोटींच्या कामांना स्थगिती; काॅंग्रेस नेते झाले आक्रमक...

लोकांच्या करातून आलेला पैसा आज त्यांच्या कामी पडत नाहीये. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असे महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या ७०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता असलेल्या कॉंग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. माजी मंत्री आणि सावनेरचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. राज्यात ज्या पालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये (ZP) भाजपचे सरकार नाही, कॉंग्रेस (Congress) किंवा इतर पक्षांचे सरकार आहे, तेथे राज्य सरकार (State Government) सामान्य जनतेची गळचेपी करीत आहे. लोकशाहीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी उचलले हे पाऊल आहे. लोकांच्या करातून आलेला पैसा आज त्यांच्या कामी पडत नाहीये. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असे महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे.

नियमांच्या विरोधात कुणी कुठलेही काम करू शकत नाही. मग जिल्हा परिषदेच्या कामांत अनियमितता कशी, हे कुणीही दाखवावे, असे आवाहन लोंढे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हारले, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितींमध्ये आणि नगरपंचायतींमध्येही त्यांना हात पत्करावी लागली. त्याचा बदला हे मतदारांकडून, सामान्य जनतेकडून घेत आहेत. आम्ही या कृतीचा निषेध करतो, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले.

आज जे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांच्यावर जनतेने विकास कामे करण्याची जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी घेऊन जनतेच्या हक्कासाठी आमदार सुनील केदार, माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. जनतेला न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील, असेही लोंढे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sunil Kedar
Video: आमच्या लोकांना सांभाळण्यात उणिवा राहिल्या; सुनील केदार

राज्यात महाविकास आघाडीची सरकार असताना नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायतींवर महाविकासने एकापाठोपाठ विजय मिळविले. यामध्ये कॉंग्रेस नेते आमदार सुनील केदार यांनी या निवडणुकी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेवर सद्यःस्थितीत आमदार केदारांची सत्ता आहे आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. नागपूर जिल्ह्यात आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक कामांमध्ये अडवणूक करीत आहेत. या अन्यायाच्या विरोधात कॉंग्रेसने आता लढा पुकारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com