वर्ध्यात मनसेला खिंडार : उपजिल्हाध्यक्षांसह ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

बोरकर यांना राष्ट्रवादीत आणण्यात हिंगणाघाट येथील पक्षाचे नेते अतुल वांदिले यांनी मोठी भूमिका निभावली.
Mns office bearers join Ncp
Mns office bearers join Ncp sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) वर्ध्याचे उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर यांच्यासह ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (ncp) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बोरकर यांना राष्ट्रवादीत आणण्यात हिंगणाघाट येथील पक्षाचे नेते अतुल वांदिले यांनी मोठी भूमिका निभावली. या पक्षप्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. (50 office bearers including MNS Wardha district vice president join NCP)

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकदा बाजी मारली आहे. मात्र, मागील काही काळात ती जागा आपण जिंकू शकलो नाही. आजच्या बोरकर यांच्या पक्षप्रवेशाने ही जागा पुन्हा पक्षाला मिळवून देण्यास मोठा हातभार लागेल यात शंका नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Mns office bearers join Ncp
आम्ही स्टेट फॉरवर्ड माणसं; लपून डाव टाकणाऱ्यांना कोर्टाची चपराक : राजन पाटील

ते म्हणाले की, पक्ष संघटनेत ताकद असेल तर सत्तेत नसतानाही आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. सुदैवाने आपण आता सत्तेत आहोत, त्यामुळे आपल्या विभागाचे प्रश्न तुम्ही हक्काने सांगू शकता, असेही ते म्हणाले. हिंगणघाट विधानसभेचे वातावरण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Mns office bearers join Ncp
शिरूरमध्ये भाजपला धक्का : दादा पाटील फराटेंचा तालुकाध्यक्षपदाचा अखेर राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा जनमानसातील प्रभाव पाहून त्याला पाठबळ देणारा पक्ष आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना राजकीय कारकिर्द घडविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मिळेल, असा विश्नासही जयंत पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या बोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दिला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजूभाऊ ताकसाळे, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपस्थित होते.

Mns office bearers join Ncp
शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे!

दरम्यान, प्रसिद्ध गायक प्रदीप कांबळे यांनीही आज (ता. १५ फेब्रुवारी) खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुरेखाताई पुणेकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com